Hashtagintro

Virat Kohli : सचिनही म्हणेल, अरे चिकू आता बस्स कर! रेकॉर्ड मोडता मोडता विराटची मास्टर ब्लास्टरच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी, आता फक्त एकदाच…

Virat Kohli : सचिनही म्हणेल, अरे चिकू आता बस्स कर! रेकॉर्ड मोडता मोडता विराटची मास्टर ब्लास्टरच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी, आता फक्त एकदाच…

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील चौथ्या सामन्यात 244 धावांनी मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलाय. 13 नोव्हेंबरला माउंट माउंगानुई येथील बे ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 334 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या 89 धावांवर आटोपला. भारताचे 7 फलंदाज दोन अंकी आकडाही गाठू शकले नाही. यामध्ये किंग कोहल म्हणजे विराट कोहलीचाही समावेश होता. कोहली 4 चेंडूंचा सामना करून शून्यावर बाद झाला. विशेष म्हणजे, न्यूझीलंडमध्ये वनडे क्रिकेट खेळताना कोहली पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला आहे. या खराब कामगिरीमुळे त्याच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झालीये.

वनडेमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्यात सचिनच्या बरोबरीला

विराट कोहलीचा वनडे क्रिकेटमधील रेकॉर्ड शानदार राहिला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याने अर्धशतकी खेळी केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. चौथ्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, त्याला खातेही उघडता आले नाही.

वनडे क्रिकेटमध्ये कोहली 20व्यांदा शून्यावर बाद झाला आहे. यासह तो भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नकोशा विक्रमाच्या बरोबरीला पोहोचला आहे.

वनडेमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय फलंदाज

विराट कोहली – 20

सचिन तेंडुलकर – 20

जवागल श्रीनाथ – 19

रोहित शर्मा – 18

अनिल कुंबळे – 18

जहीर खानचा विक्रम मोडण्याच्या जवळ

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम जहीर खानच्या नावावर आहे. तो 43 वेळा शून्यावर बाद झाला होता. कोहली आता 42 वेळा शून्यावर बाद झाला असून तो जहीरच्या विक्रमापासून अवघ्या एका डकने दूर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक डक असलेले भारतीय खेळाडू

जहीर खान – 43

विराट कोहली – 42

इशांत शर्मा – 40
हरभजन सिंग – 37

जसप्रीत बुमराह – 37

रोहित शर्मा – 36

दरम्यान, आता पुढील सामना हा टीम इंडियाला जिंकावाच लागणार आहे. त्याशिवाय मालिका खिशात घालता येणार नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम एकदिवसीय सामना  हा 15 नोव्हेंबर 2026 रोजी खेळवला जाणार आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language