Hashtagintro

Warana Sugar Factory | वारणा कारखान्याचा प्रतिटन ४,२०० रुपये ऊस दर जाहीर

वारणानगर : येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसास प्रतिटन ४,२०० रुपये ऊस दर देण्याची घोषणा आमदार डॉ.विनय कोरे यांनी सोमवारी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी झालेल्या चर्चेप्रमाणे पहिला हप्ता प्रतिटन ३९०० रुपये, गळीत हंगाम समाप्तीनंतर १०० रुपये आणि अंतिम हप्ता २०० रुपये देणार असल्याचे जाहीर केले. चालू हंगामातील ऊस दर निश्चित करताना शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताला प्राधान्य देण्यात आले आहे. जाहीर केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत पैसे मिळणार असून, एकूण प्रतिटन ४२०० रुपये दर देण्यात येणार असल्याचे आमदार डॉ. कोरे यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सर्व ऊस उत्पादक सभासद, वाहतूकदार मालक आणि कारखान्याचे कामगार यांनी उत्तम समन्वय व सहकार्य राखून आपला सर्व ऊस वारणा कारखान्यालाच गळितासाठी देऊन कारखान्याचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आ. कोरे, उपाध्यक्ष प्रतापराव पाटील आणि कार्यकारी संचालक शहाजीराव भगत यांनी केले आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language