Hashtagintro

Warananagar Accident | वारणानगर येथे ट्रॅक्टरमधून पडून पारगावचा चालक ठार

वारणानगर : जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथील ऊस भरून गळीतासाठी वारणा साखर कारखान्याकडे आलेला ट्रॅक्टर कारखान्याच्या गाडी अड्ड्याजवळ आला असता चालक शामराव आनंदा धुमाळ (वय ५८, रा. जुने पारगाव) यांना चक्कर आल्याने ते खाली पडले. यावेळी ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना दुपारी वारणा मुद्रणालयासमोर घडली.

पारगाव (ता. हातकणंगले) येथील भीमराव धुमाळ यांच्या मालकीचा ट्रॅक्टर बंधू शामराव आनंदा धुमाळ चालवीत होते. ते उसाने भरलेला ट्रॅक्टर गळीतासाठी वारणा कारखान्याकडे घेऊन येत होते. गाडीअड्ड्याजवळ वारणा प्रेससमोरील रस्त्यावर आले असता त्यांना अचानक चक्कर आली आणि क्षणार्धात ते ट्रॅक्टरमधून खाली पडले. यावेळी ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले.

सलग दुसरी घटना

शुक्रवारी रात्री वारणा साखर कारखान्यास ऊस उतरून मांगले (ता. शिराळा) गावी जात असताना रिकाम्या ट्रॅक्टरमधून पडून बाबासो यशवंत मोहिते (रा. मांगले) यांचा मृत्यू झाला होता. तर आज सलग दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टरमधून पडूनच शामराव धुमाळ या चालकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language