Hashtagintro

Yavatmal Accident | मॉर्निंग वॉकला गेलेल्या युवकाचा कारच्या धडकेत मृत्यू

Brahmangaon Hardada Road Morning Walker Death

उमरखेड : मॉर्निंग वॉकसाठी पत्नीसह गेलेल्या युवकाला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि, २४) सकाळी सुमारे ६ वाजताच्या दरम्यान ब्राह्मणगाव–हरदडा रस्त्यावर घडली. कुलदीप गंगाधर हुलकाने (वय ४०, रा. ब्राह्मणगाव, ता. उमरखेड) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे ब्राह्मणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप हुलकाने हे शनिवारी सकाळी पत्नीसह ब्राह्मणगाव–हरदडा रस्त्याने मॉर्निंग वॉक करून ब्राह्मणगावकडे परत येत होते. यावेळी ब्राह्मणगावकडून ढाणकीच्या दिशेने जाणाऱ्या( एमएच, २६ सीवाय ६२७२) क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीत पडले. या अपघातात जागीच त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अपघातानंतर संबंधित कार एका बिटरगाव ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकाऱ्याची असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.विशेष म्हणजे सदर कार एक महिला चालवत असल्याचे समोर आल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी कार चालक महिलेला अटक करण्याची मागणी करीत उमरखेड पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच उमरखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे आणि बीट जमादार दिलीप चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सहाय्यक रासायनिक विश्लेषक अमर नरवाडे आणि घनश्याम पोहरकर यांच्या पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. अपघातासंदर्भात उमरखेड पोलीस पुढील तपास करीत असून, वृत्त लिहिपर्यंत कारचालक महिलेचे नाव समजू शकले नव्हते.

मनमिळाऊ स्वभावाचे व्यावसायिक म्हणून परिचित असलेल्या कुलदीप हुलकाने यांच्या अपघाती मृत्यूमुळे ब्राह्मणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language