Hashtagintro

Yoga Tips: एनर्जी बूस्ट करतात ‘ही’ 4 योगासनं, दररोज केल्याने येणार नाही आळस आणि थकवा

Yoga Tips: एनर्जी बूस्ट करतात ‘ही’ 4 योगासनं, दररोज केल्याने येणार नाही आळस आणि थकवा

अनेकांना दिवसभर सुस्ती, आळस आणि थकवा जाणवतो. सकाळी पुरेशी झोप घेऊन उठल्यानंतरही काही वेळातच शरीरात ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटते. अशावेळी थकवा दूर करण्यासाठी अनेक जण चहा किंवा कॉफीचा आधार घेतात. मात्र, केवळ चहा-कॉफी पिणे हा यावर उपाय नाही. शरीराला दिवसभर सक्रिय आणि उत्साही ठेवण्यासाठी रोजच्या दिनचर्येत काही योगासनांचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. नियमित योगाभ्यास केल्याने शरीराची हालचाल सुधारण्यास, मन प्रसन्न राहण्यास आणि फ्रेश वाटण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभराचा आळस आणि सुस्ती कमी करण्यासाठी रोज काही मिनिटे योगासनांसाठी द्या.

नाडी शोधन प्राणायाम

नाडी मानवी शरीरातील सूक्ष्म ऊर्जा वाहिन्या आहेत, ज्या वेगवेगळ्या कारणांमुळे ब्लॉक होऊ शकतात. नाडी शोधन प्राणायाम हे श्वासोच्छवासाचे तंत्र आहे, जे या ब्लॉक एनर्जी चॅनलला साफ करण्यास मदत करते ज्यामुळे मन शांत होते. या तंत्राला अनुलोम-विलोम प्राणायाम असेही म्हणतात. नाडी शोधन प्राणायाम मनाला विश्रांती देण्यास मदत करतो आणि ध्यानस्थ अवस्थेत जाण्यासाठी तयार करतो. दररोज फक्त काही मिनिटे याचा सराव केल्याने मन शांत आणि प्रसन्न होते. यामुळे तणाव आणि थकवा दूर होण्यास मदत होते.

शलभासन

या आसनमुळे शरीरात चपळता येते आणि संपूर्ण पाठ, खांदे आणि हातांची लवचिकता आणि ताकद देखील वाढते. या योगासनामुळे पोटाच्या अवयवांना मसाज आणि टोन मिळतो तसेच पचनक्रिया सुधारते. हे पोट आणि आतड्यांना उत्तेजित करते, ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल गॅसपासून मुक्त होते, मूत्राशय मजबूत होते आणि पाठीचा कणा ताणला जातो. दैनंदिन दिनक्रमात या आसनाचा समावेश करा.

उत्कटासन

खुर्चीवर बसणे खूप सोपे आणि आरामदायक वाटते, परंतु काल्पनिक खुर्चीवर बसणे थोडे अवघड असू शकते. हे योगासन ऊर्जा केंद्रे उघडते, पाठीचा कणा, नितंब आणि छातीचे स्नायू आणि पाठीचा खालचा भाग आणि धड मजबूत करण्यास मदत करते. हे आसन मांडी, घोटा, पाय आणि गुडघ्याच्या स्नायूंना टोन करते.

वीरभद्रासन

हे आसन पाय आणि पाठीचा खालचा भाग मजबूत आणि निरोगी बनवते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहे. या आसनामुळे शरीरातील संतुलन सुधारते आणि स्टॅमिना वाढण्यास मदत होते. खांदे अकडण्याच्या समस्येमध्ये हे अत्यंत फायदेशीर आहे. दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी हे आसन रोज करा.

Source: TV9 Marathi Lifestyle

Read full article on TV9 Marathi Lifestyle

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language