Hashtagintro

Youth killed over verbal abuse controversy | शिवीगाळ केल्याच्या रागातून युवकाचा खून

परभणी : तू नेहमी जोरजोरात शिवीगाळ का करतोस, आमच्या घरात आई; बहिणी आहेत, असे म्हणत झालेल्या वादातून युवकाला घराबाहेर नेऊन धारदार चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना गंगाखेड रोडवरील फरीद कॉलनी परिसरात घडली. इरफान खान हबीब खान (वय ३१) असे मृत युवकाचे नाव असून याप्रकरणी चौघांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला संशयित आरोपींची नावे आहे. याबाबत शमा खान यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये शेख लतीफ शेख यासीन, शेख एजाज शेख लतीफ, शेख साबेर शेख लतीफ आणि शेख बब्बु शेख लतीफ (सर्व रा. परभणी) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास इरफान कामावरून घरी आला. गरमी होत असल्याने त्याने कूलर सुरू करण्यास सांगितले; मात्र कूलरचे पाते तुटलेले असल्याने कूलर सुरू करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे इरफानने रागाच्या भरात वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इरफानची शिवीगाळ ऐकून शेजारी राहणारे शेख लतीफ, शेख एजाज, शेख साबेर आणि शेख बब्बु तेथे आले. तू नेहमीच शिवीगाळ करतोस, आमच्या घरात महिला आहेत, असे म्हणत त्यांनी मारहाण सुरू केली.

त्यानंतर आरोपींनी इरफानला घराबाहेर नेऊन धारदार चाकूने त्याच्यावर वार केले. यातील एक गंभीर वार लागल्याने इरफान रक्तबंबाळ झाला. त्याला तातडीने शासकीय व नंतर खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच ३ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास इरफानचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language