Hashtagintro

अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने शहरात त्यांचे भव्य स्वागत केले आहे. पुणे विमानतळ ते जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेलपर्यंत आणि अमित शहांचा ताफा ज्या ज्या मार्गांवरून जाणार आहे, त्या संपूर्ण मार्गावर शिंदे गट शिवसेनेकडून मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेलच्या बाहेर शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्याकडून एक भला मोठा बॅनर लावण्यात आला आहे, जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे फोटो आहेत.

हे बॅनर “भारताचे यशस्वी गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच पुणे पुण्यनगरीमध्ये हार्दिक स्वागत” असे संदेश देत आहेत. शहरभर लावण्यात आलेल्या या बॅनरमध्ये भाजपपेक्षा शिंदे गट शिवसेनेच्या बॅनरची अधिक चर्चा होत आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही भाजपच्या वतीने काही बॅनर लावले असले, तरी शिंदेसेनेचे बॅनर अधिक लक्षवेधी ठरत आहेत.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language