Hashtagintro

आंध्र प्रदेशावर पुन्हा चक्रीवादळाचे संकट! 100 किमी वेगाने वारे; 'मुरासू' कधी धडकणार?

Murasu Cyclone: बंगालच्या उपसागरात आणखी एका चक्रीवादळाची निर्मिती होत असून, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होत असून, 2 नोव्हेंबरपर्यंत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे वादळ 3 नोव्हेंबरच्या पहाटे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या संभाव्य चक्रीवादळामुळे ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, वाऱ्याचा वेग काही ठिकाणी ताशी 100 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. या वादळाची तीव्रता आणखी वाढल्यास त्याचे भीषण चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या चक्रीवादळाला ‘मुरासू’ (Murasu) असे नाव दिले जाणार आहे. तमिळ भाषेत ‘मुरासू’ म्हणजे नगारा किंवा ढोल असा अर्थ होतो. या वादळाचे नाव भारताने सुचवले आहे.

बंगालच्या उपसागरात वादळाची तीव्रता वाढतेय!
IMD च्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र ताशी 30 किलोमीटर वेगाने वायव्य दिशेने सरकत होते. त्यावेळी हे क्षेत्र चेन्नईपासून सुमारे 960 किलोमीटर, विशाखापट्टणमपासून 980 किलोमीटर आणि मच्छलीपट्टणमपासून 1,030 किलोमीटर अंतरावर होते. या प्रणालीचे 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता होती. त्यानंतर 1 नोव्हेंबरला चक्रीवादळ आणि 2 नोव्हेंबरपर्यंत तीव्र चक्रीवादळाची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
https://www.prahaar.in/2026/10/31/sardar-vallabhbhai-patels-birth-anniversary-occasion-citizens-from-naxal-affected-areas-participated-as-special-guests-conveying-a-message-of-peace-development-and-national-unity/.
आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा
या संभाव्य चक्रीवादळामुळे 2 नोव्हेंबरला किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि यानम येथे काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 3 नोव्हेंबरलाही अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायलसीमा भागातही 2 आणि 3 नोव्हेंबर रोजी काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात देशातील बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, ऑक्टोबर 2026 हा 1901 नंतर देशातील सरासरी कमाल तापमानाच्या दृष्टीने सर्वाधिक उष्ण ऑक्टोबर ठरल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language