
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा कायमच चर्चेत राहिला आहे. मग त्याचा सिनेमा असो किंवा खासगी आयुष्य. नेहमीच आमिर खान हा चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच आमिर खान हा तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. त्याच्या या तिसऱ्या लग्नाची सर्वत्र चर्चा झाली. आता इंडस्ट्रीचे आयकॉनिक व्हिलन अजित यांचे पुत्र शहजाद खानही त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत. ते ६० वर्षांचे झाले आहेत, पण तरीही त्यांची आणखी दोन लग्ने करण्याची इच्छा आहे. हा खुलासा त्यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार हा अभिनेता?
आमिर आणि शहजाद यांचा जुना संबंध राहिला आहे. आमिरने जेव्हापासून गौरी स्प्रॅटशी ६० व्या वर्षी तिसरे लग्न केले आहे, तेव्हापासून त्यांच्या वैयक्तिक संबंधांवर लोक मोकळेपणाने बोलू लागले आहेत. याच गोष्टीचा उल्लेख करत शहजाद यांनीही आपली बाजू मांडली. आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलताना शहजाद यांनी एएनआयला सांगितले की, माझ्याही दोन बायका आहेत. एक एक्स आणि एक सध्याची. आम्ही आमिर खानच्या विचारसरणीतून येतो. अजूनही खूप काही होऊ शकते. माझ्याकडे दोन पर्याय बाकी आहेत. मात्र अभिनेत्याने हे सगळे विनोद म्हणून सांगितले.
शहजाद यांचे वैयक्तिक जीवन
शहजाद यांची पहिली पत्नी रुकैया होत्या. जोडप्याने १९९१ मध्ये लग्न केले होते. त्यांच्यापासून घटस्फोटानंतर अभिनेत्याने दुसरे लग्न हुमैरा खान यांच्याशी २००८ मध्ये केले. शहजाद यांना पहिल्या लग्नातून एक मुलगा आहे फारिस खान, आणि दुसऱ्या लग्नातून एक मुलगी आणि एक मुलगा आहेत.
शहजाद यांच्या वडिलांनीही ४ लग्ने केली होती. त्यांच्या पहिल्या लग्नातून तीन मुले असूनही त्यांनी सत्य लपवून दुसरे लग्न केले. नंतर आणखी दोन पत्नींसोबत संबंध जोडले. शहजाद यांचे आपल्या वडिलांशी विशेष चांगले संबंध राहिले नाहीत. शहजाद सांगतात की, त्यांना अभिनेत्याचे कॉमेडी करणे आवडत नव्हते. ते म्हणायचे की, मी व्हिलन बनून जे नाव कमावले ते तुम्ही कॉमेडी करून मातीत मिळवले.
शहजाद ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटातील भल्ला या भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांनी आमिर खान यांच्या ‘कयामत से कयामत तक’ चित्रपटातून डेब्यू केला होता. ते ‘पुरानी हवेली’, ‘तिरंगा’, ‘बरसात’ सारख्या अनेक चित्रपटांचा भाग राहिले आहेत.
Source: TV9 Marathi Entertainment
