Hashtagintro

एका रात्रीत नाटकातून केलं रिप्लेस, कलाकारांचा केतकी आणि रोहनला पाठिंबा, अपूर्वा नेमळेकर म्हणाली, नुसती हौस असून…

एका रात्रीत नाटकातून केलं रिप्लेस, कलाकारांचा केतकी आणि रोहनला पाठिंबा, अपूर्वा नेमळेकर म्हणाली, नुसती हौस असून…

‘आमने सामने’ या नाटकाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून या नाटकाचे अनेक प्रयोग झाले आहेत. या नाटकात अभिनेत्री केतकी पालव आणि अभिनेता रोहन गुजर गेल्या सात वर्षांपासून काम करत आहेत. मात्र, आता दोघंही या नाटकात दिसणार नसून त्यांना रिप्लेस करण्यात आलं आहे. रोहन आणि केतकीने यासंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रोहन आणि केतकी म्हणाले की, ‘आम्ही इथून पुढे ‘आमने सामने’ या नाटकाचा भाग नसणार आहोत. ऑक्टोबर महिन्यात रवींद्र नाट्यमंदिरला आमच्या नाटकाचा प्रयोग झाला. त्या प्रयोगानंतर आमची एक मिटींग झाली आणि त्या मिटींगमध्ये आम्हाला सांगितलं की, हा तुमचा शेवटचा प्रयोग आहे. आम्ही आमचा शेवटचा प्रयोग सेलिब्रेट सुद्धा करू शकलो नाही.आम्हाला याबद्दल कोणतीही पूर्वकल्पनाही दिली नाही. मानधन या कारणामुळे आम्ही वेगळे झालो आणि थांबलो. कोव्हिडमध्ये आम्ही अर्ध्या पाकिटात काम केलं. मध्यंतरी निर्मात्यांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाले, तेव्हाही आम्ही या नाटकाबरोबर होतो. तर एकंदर सॉरी…खरंच हे हर्ट होतंय. त्यांच्या नव्या टीमला शुभेच्छा.’

अपूर्वा नेमळेकरची कमेंट

केतकी आणि रोहनच्या व्हिडिओवर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनं कमेंट करत लिहिलं की, ‘रोहन, ज्या नाटकासाठी तू आपली ७ वर्षं आणि केतकीने ५ वर्षं दिली, ज्या भूमिकांमध्ये स्वतःचा जीव ओतला, तिथून तुम्हाला एका रात्रीत अचानक रिप्लेस केलं जातं? आणि कारण काय, तर तुम्हाला मानधनात वाढ हवी होती, हे सगळं फार चुकीचं आहे. एक अभिनेत्री म्हणून मला तुमच्या दोघांच्या मनातली ही कालवाकालव, तुमचा संताप आणि तुमचं दुःख अगदी जवळून समजतंय. पण मला तुमचा प्रचंड अभिमान वाटतोय की, तुम्ही यावर गप्प न बसता आवाज उठवलात.’

 

‘शेवटी नाटकावर कितीही प्रेम असलं, तरी मानधन हे आपल्या कामासाठी असतं आणि त्याची गणितं प्रत्येकालाच बघावी लागतात. कारण आपल्यालाही घर चालवायचंय, बिल्स पे करायची आहेत, फॅमिलीकडे बघायचंय. त्यामुळे नुसती हौस असून चालत नाही, हा आपला व्यवसाय आहे आणि त्यासाठी करेक्ट मोबदला आणि करेक्ट पेमेंट्स हे मिळालेच पाहिजेत! रोहन आणि केतकी, तुम्ही दोघांनीही अप्रतिम काम केलंय आणि तुम्ही दाखवलेल्या या हिमतीचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. रिप्लेसमेंटचं दुःख काय असतं हे मी स्वतः जवळून पाहिलंय आणि अनुभवलंय. जेव्हा आपण एखाद्या भूमिकेसाठी जीव ओतून काम करतो आणि अचानक प्रोड्युसर त्या जागी दुसऱ्याच कोणालातरी उभं करतो, तेव्हा खूप त्रास होतो. पण लक्षात ठेवा, तुमच्या कामाने तुम्ही प्रेक्षकांच्या मनात ऑलरेडी घर केलेलं आहे आणि ते आयुष्यभर तसंच राहणार आहे! So, don’t feel low, don’t be disheartened. Believe in yourself! At the end, जे तुमच्या नशिबात आहे ते तुमच्याकडून कधीच कोणी ओरबाडून घेऊ शकत नाही.’

तसेच अभिनेता आस्ताद काळेनं कमेंट करत लिहिलं की, ‘खरं कारण माहिती आहे, ते कळल्यावर मलाही संताप आला होता. तुमचं काय झालं असेल? पण, तसं असतानाही इतकं शांतपणे बोलणं अवघड असतं, कौतुक वाटलं तुमचं. आम्ही अनेकजण तुमच्या पाठीशी आहोत. खूप खूप शुभेच्छा.(शिवाय निर्माता/Senior म्हणून कसं वागू नये या माझ्या शिक्षणात अजून एका धड्याची भर पडली.)’

 

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language