Hashtagintro

एकेकाळी RIL च्या IPO साठी मरीन ड्राइव्ह उजळली, आता जिओच्या IPO ची प्रतीक्षा; उदय कोटकांनी उलगडला प्रवास

एकेकाळी RIL च्या IPO साठी मरीन ड्राइव्ह उजळली, आता जिओच्या IPO ची प्रतीक्षा; उदय कोटकांनी उलगडला प्रवास

1977 मधील मुंबईत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या आयपीओचा उत्साह पाहायला मिळाला होता. त्या वेळी मरीन ड्राइव्हपासून चौपाटीपर्यंत रोषणाई करण्यात आली होती. उदय कोटक यांनी या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, तेव्हा ते अवघे 18 वर्षांचे होते. आता जवळपास पाच दशकांनंतर रिलायन्स समूहाची डिजिटल कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्स शेअर बाजारात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. कोटक यांच्या मते, हा आयपीओ भारतीय भांडवली बाजारासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. तसेच, रिलायन्स समूहाच्या नव्या पिढीतील नेतृत्वाची क्षमताही यातून अधोरेखित होईल.

21 ते 23 ऑक्टोबर या काळात जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ खुला होणार आहे. कंपनीने प्रति शेअर 1,065 से 1,119 रुपये अशी किंमत निश्चित केली आहे. वरच्या किंमत पातळीवर कंपनी सुमारे 30,200 कोटींचा निधी उभारू शकते. त्यामुळे हा आयपीओ भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे.

भारतातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता

उदय कोटक यांनी धीरूभाई अंबानी यांचे आभार मानताना सांगितलं की, गुंतवणुकीची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी शेअर बाजारात पुढाकार घेतला. उदय कोटक यांच्या म्हणण्यानुसार, रिलायन्स समूहाचा हा आयपीओ जवळपास दोन दशकांनंतर येत आहे. जिओ प्लॅटफॉर्म्स शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर, सूचीबद्ध कंपन्यांच्या एकत्रित बाजारमूल्याच्या आधारे रिलायन्स समूह देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह बनू शकतो, असंही त्यांनी नमूद केले.. विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय करणाऱ्या मोठ्या समूहाला उद्योगसमूह असं म्हटलं जातं.

जिओची ताकद केवळ मोबाइल कनेक्शनपुरती मर्यादित नाही

यावेळी जिओच्या वाढत्या सामर्थ्याविषयी बोलताना कोटक यांनी कंपनीच्या ग्राहकसंख्येचा आणि कामाचा वेग यांचा विशेष उल्लेख केला. हा आयपीओ म्हणजे रिलायन्स समूहाची नेतृत्वाची धुरा आता नव्या पिढीकडे सोपवली जात असल्याचे प्रतीक आहे. कोटक यांनी जिओच्या सामर्थ्याविषयी बोलताना सांगितलं की, कंपनीकडे 53 कोक्षा जास्त ग्राहक आहेत आणि कमी कालावधीत मोठी उद्दिष्टे साध्य करण्याची कंपनीची क्षमता ही तिची प्रमुख बलस्थाने आहेत. त्यांच्या मते, जिओने भारतातील मोबाइल कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल सेवांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जिओची कहाणी केवळ सिम कार्ड किंवा फोन कनेक्शनपुरती मर्यादित नाही.

ही कंपनी मोबाइल इंटरनेटसोबतच डिजिटल सेवा, क्लाउड आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या क्षेत्रांतही काम करते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जिओचे 53.3कोटी ग्राहक आहेत आणि भारतातील एकूण डेटा वापरापैकी सुमारे 60 टक्के डेटा वापर जिओच्या नेटवर्कवर होतो.

स्वतःचे एंड-टू-एंड कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञान असलेली जागतिक स्तरावरील कंपनी असं कोटक यांनी जिओचे वर्णन केलं. सोप्या भाषेत सांगायचे तर, नेटवर्क आणि त्याच्याशी संबंधित सेवांच्या अनेक महत्त्वाच्या घटकांवर कंपनीचे स्वतःचे नियंत्रण आहे. जिओच्या वैशिष्ट्यांबाबत कोटक यांनी हे मत व्यक्त केलं .

Source: TV9 Marathi Business

Read full article on TV9 Marathi Business

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language