Hashtagintro

ठाणे गावदेवी मार्केट आग दुर्घटना; सागर शिंदेंच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी

ठाणे : ठाण्यातील नौपाडा भागातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केट इमारतीला 21 मे 2026 रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. आग शमवण्यासाठी दाखल झालेल्या अग्निशमन दलातील 42 वर्षीय केंद्र अधिकारी सागर शिंदे आणि प्रभाग समिती कार्यालयामध्ये कार्यरत 55 वर्षीय सुरक्षारक्षक काळू गाडेकर यांचा या आगीत मृत्यू झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सागर शिंदे यांना मृत्यूच्या दोन महिन्यांपूर्वीच कन्यारत्नाचा लाभ झाला होता. मात्र शिंदे यांच्या निधनानंतर या मुलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
कर्तव्य बजावत असताना त्यांचा अचानक मृत्यू झाला. शिंदे यांच्या पश्चात त्यांची आई जयश्री, पत्नी माधुरी व दोन महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. तर काळू गाडेकर यांचे मूळ गाव गाडेकरवाडी, गंगापूर, आंबेगाव, जिल्हा पुणे हे असून मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव तेथे नेण्यात आले. गाडेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/12/maatrubhumi-5-dialogues-from-salmans-maatrubhumi-became-hits-even-before-the-films-release/
या दोन्ही कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर ठाणे महानगरपालिकेच्या सेवेत तातडीने सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. या अनुषंगाने महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनासोबत पाठपुरावा करत आज स्व. सागर शिंदे यांच्या पत्नी माधुरी सागर शिंदे यांना ठाणे महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याबाबतचे नियुक्ती पत्र खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक दिलीप बारटक्के, नगरसेवक संजय वाघुले, नारायण पवार, अतिरिक्त आयुक्त 2 मेजर डॉ. नितीन राठोड, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीष झळके आदी मान्यवर उपस्थित होते.
यापूर्वी, आरक्षक काळू गाडेकर यांचा मुलगा तेजस काळू गाडेकर याला सदर दुर्घटनेनंतर एका महिन्याच्या आत महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले होते. या निर्णयामुळे दोन्ही कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रशासनाकडून त्यांच्या उल्लेखनीय सेवेची दखल घेण्यात आली आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language