Maatrubhumi: बॉलिवूडचा सुपरस्टार भाईजान सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘मातृभूमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 2020 मध्ये गलवान खोऱ्यात घडलेल्या भारत-चीन सैनिकांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री चित्रांगदा सिंहही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरमधील ॲक्शन सीन्स आणि सलमानचा लूक यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. परंतु, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटातील काही डायलॉग हिट झाले आहेत. ट्रेलरमधील अनेक संवाद प्रेक्षकांच्या मनाला भिडले आहेत. ते कोणकोणते आहेत ते जाणून घेऊया.
https://www.prahaar.in/2026/11/12/devendra-fadnavis-develop-crops-that-yield-higher-produce-with-less-water-an-appeal-by-devendra-fadnavis/
सलमान खान आणि चित्रांगदा सिंग यांचा बहुप्रतिक्षित ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ हा चित्रपट येत्या 4 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे. पण प्रेक्षकांचे खरे लक्ष वेधून घेत आहेत ते या चित्रपटातील संवाद. हे संवाद सोशल मीडियावर वेगाने आपली छाप पाडत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाचे संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. ‘मातृभूमी’ यावर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता, नंतर हा चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार होता. पण आता तो 4 डिसेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
मातृभूमी चित्रपटातील 5 हिट संवाद
1. “अरे वाह! भाषा समझते हैं, भावनाएं भी समझेंगे!”
2. “सचेज़वान में कुछ काला है!”
3. “हम सैनिक हैं, हम ऐसे दिनों के लिए ही बने हैं.”
4. “यह तो सुना होगा, एक बिहारी सौ पर भारी!”
5. “मौत से क्या डरना, उसे तो आना है!”
तसेच एकाच दिवशी प्रदर्शित होणारा ‘ ईथा’ या श्रद्धा कपूरच्या चित्रपटाला सलमान खानने एक खास संदेश दिला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलरची लिंक शेअर केली आहे. त्याने असेही लिहिले आहे, ” ईथासाठी खूप खूप शुभेच्छा.”
Source: Prahaar News
