Hashtagintro

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय Antibiotics घेताय? हे ८ भयंकर Side Effects जाणून घ्या…

antibiotics side effects

अँटीबायोटिक्समुळे पोटातील गुड बॅक्टेरियांचे (उपयुक्त जिवाणू) संतुलन बिघडते. पोटात तीव्र कळा येणे किंवा दुखणे अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

antibiotics side effects

संसर्गाशी लढताना शरीर बरीच ऊर्जा खर्च करत असते. त्यामुळे अँटीबायोटिक्सचा कोर्स सुरू असताना शरीरात प्रचंड अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागतो.

antibiotics side effects

अनेकदा रिकाम्या पोटी अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे जळजळ होणे, मळमळणे किंवा उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो.

antibiotics side effects

पोटातील अन्न पचवणारे उपयुक्त बॅक्टेरिया कमी झाल्यामुळे पचन संस्था कोलमडते; परिणामी अन्नावरची रुची उडते आणि भूक मंदावते.

antibiotics side effects
acne

काहींना विशिष्ट अँटीबायोटिक्सची अ‍ॅलर्जी असण्याची शक्यता असते. अशा वेळी त्वचेवर लालसर चट्टे उठणे, खाज सुटणे किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो.

antibiotics side effects

जुलाब (डायरिया) हा अँटीबायोटिक्सचा अतिशय सामान्य दुष्परिणाम मानला जातो. पोटातील चांगले जिवाणू नष्ट झाल्यामुळे पचन बिघडते आणि हा त्रास उद्भवतो.

antibiotics side effects

औषधांचा शरीरावर होणारा थेट परिणाम किंवा डिहायड्रेशनमुळे (पाण्याची कमतरता) काही रुग्णांना तीव्र डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो.

antibiotics side effects

अँटीबायोटिक्सच्या प्रभावामुळे शरीराचा तोल बिघडल्यासारखा वाटणे, ग्लानी येणे किंवा अचानक चक्कर आल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात.

antibiotics side effects

अँटीबायोटिक्स औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या. प्रिस्क्रिप्शनशिवाय परस्पर औषधे घेणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते!

येथे क्‍लिक करा.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language