Hashtagintro

तात्काळ इराण सोडा, अमेरिकन नागरिकांना सर्वात मोठा अलर्ट, भयंकर हल्ल्याचा इशारा; मोठं काही घडणार?

तात्काळ इराण सोडा, अमेरिकन नागरिकांना सर्वात मोठा अलर्ट, भयंकर हल्ल्याचा इशारा; मोठं काही घडणार?

अमेरिकेने इराणमध्ये असलेल्या आपल्या नागरिकांना तात्काळ इराण सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. अमेरिकन नागरिकांनी इराणचा प्रवास करू नये. जे लोक आधीपासूनच इराणमध्ये आहेत, त्यांनी शक्य तितक्या लवकर हा देश सोडावा, असा इशाराच इराणमधील अमेरिकी व्हर्च्युअल एम्बेसीने दिला आहे. अमेरिकेने आपल्या नागरिकांना इराण सोडण्यास सांगितल्यामुळे मध्य पूर्वेत आणि अमेरिकेच्या ठिकाणांवर मोठा हल्ला होण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेच्या या अलर्टमुळे जगभर खळबळ उडाली आहे.

इराण समर्थित हूती बंडखोरांचे हल्ले आणि इराणकडून अमेरिकन अधिकाऱ्यांना आणि ठिकाणांना निशाणा बनवलं जाणार आहे. त्यामुळे इराणमध्ये तणाव वाढू शकतो, असा इशारा अमेरिकेने दिला आहेत. तसेच इराणनने बहरीन आणि कुवैतमध्ये अमेरिकन ठिकाणांना टार्गेट केलं आहे. तर हूतींच्या हल्ल्यात सौदी अरेबियातील नागरिक विमानतळ आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना टार्गेट केलं आहे. या हल्ल्याने अनेकांजण जखमी झाले आहेत. तसेच हवाई सेवा प्रभावीत झाल्याचं सांगितलं जात आहे.

एअरस्पेस बंद होण्याची भीती

इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उड्डाणे रद्द होणं, एअरस्पेस बंद होणं, प्रवासात अडथळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी एअरलाइन्सच्या संपर्कात राहावं. निदर्शने आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहा. ज्या ठिकाणी पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित असतील तिथे जाऊ नका. स्थानिक प्रशासनाच्या निर्देशाचं पालन करा. अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या अलर्ट सिस्टिममध्ये नोदंणी करा, अशा सूचनाही अमेरिकेने दिल्या आहेत.

राजनैतिक संबंध नाही

दरम्यान, अमेरिका आणि इराण दरम्यान 1980 पासून कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत. इराणमध्ये अमेरिकेच्या हितांचे प्रतिनिधीत्व स्वित्झर्लंड करत आहे. अमेरिकेने आपात्कालीन स्थितीत आपल्या नागरिकांना तेहरानमधील स्विस दुतावासाच्या अमेरिकन हित विभागाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.

तणाव निवळलाच नाही

काही दिवसांपूर्वी अमेरिकेत मध्यावधी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला मोठी हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे अमेरिकेची धोरणं बदलतील आणि इराणसोबतचं युद्ध टळेल असे कयास वर्तवले जात होते. पण ट्रम्प यांचा नूर काही बदलेला दिसत नाही. त्यांनी इराणला धडा शिकवण्याचा विडाच उचलला असल्याचं दिसून येत आहे. इराणने उद्या अमेरिकन ठिकाणांवर हल्ला केल्यावर अमेरिका काय प्रत्युत्तर देणार याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language