Hashtagintro

थेट एकाचे मुंबई कनेक्शन, टायगर श्रॉफ प्रकरणातील आरोपी ताब्यात..

थेट एकाचे मुंबई कनेक्शन, टायगर श्रॉफ प्रकरणातील आरोपी ताब्यात..

टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट पुढे येत आहे. रात्री टायगर श्रॉफ याच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. तीन आरोपींनी मिळून हा गोळीबार केला. या गोळीबाराचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाली. टायगर श्रॉफच्या गाडीच्या अत्यंत जवळ येऊन हे हल्लेखोर हल्ला करताना दिसले. त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत दिसत होतीय. हल्ल्यानंतर तात्काळ टायगर श्रॉफ पोलिस ठाण्यात पोहोचला आणि त्यानंतर पोलिसांच्य सुरक्षेत तो हॉस्पिटलमध्ये गेला. टायगर श्रॉफच्या हल्लेखोरांना पकडण्याचे मोठे आव्हान मुंबई पोलिसांपुढे होते. पोलिसांनी या आरोपींना पकडण्यासाठी काही पथके तयार केली. अवघ्या 17 तासातच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. याकरिता कोटा पोलिसांची मदत मुंबई पोलिसांनी घेतली. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील फरार तीन आरोपींना राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आले. अँटी गँगस्टर टास्क फोर्स आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमधून तिन्ही आरोपींना पकडले आहेत. गोळीबार प्रकरणानंतर तिन्ही आरोपी फरार होते.
कोटा रेल्वे स्थानकात सापळा रचून पोलिसांनी तिघांना घेतले.

ताब्यात आरोपींमध्ये महाराष्ट्रातील एक आणि हरियाणातील दोन जणांचा समावेश आहे. गोळीबार प्रकरणानंतर तिन्ही आरोपी फरार होते. कोटा रेल्वे स्थानकात सापळा रचून पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात घेतले. आता आरोपींची नावे पुढे आली आहेत. फूल सिंह वय 17 हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील बडोदा थुथन येथील रहिवासी आहे.

ऋतिक कुमार उर्फ रोशन वय 22 मूळचा बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील पिपराई गावचा रहिवासी. सध्या अंधेरी पश्चिम मुंबई येथे वास्तव्यास. रॅपिडो रायडर म्हणून काम करत होता. रेहान वय 18 हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील ईदगाह कॉलनी परिसरातील रहिवासी. तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले. कोटा पोलिसांनी मुंबई पोलिसांची मदत केल्याची माहिती मिळतंय. अजून या प्रकरणात काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language