Hashtagintro

ना केस पांढरे, ना कोणता रोग… रामदेव बाबा खातात या 3 भाज्या, फिटनेसचं प्राचीन सीक्रेट उघड

ना केस पांढरे, ना कोणता रोग… रामदेव बाबा खातात या 3 भाज्या, फिटनेसचं प्राचीन सीक्रेट उघड

योगगुरू बाबा रामदेव दिवसातून केवळ एकवेळच जेवण करतात. आहारात फक्त तीन प्रकारच्या भाज्या घेतात. बाबा रामदेव अत्यंत सात्विक आहार घेत असतात. गेल्या 50 वर्षात त्यांना कधीच कोणता आजार झाला नाही. त्यांचे केस पांढरे झाले नाहीत. त्यांचं वजन 65 किलो आहे. हिमोग्लोबीन 17.5, रक्तदाब 70/110 आणि साखरेचा स्तर 70-75 च्या दरम्यान आहे. त्यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य उघड केलं आहे. त्यांचा संपूर्ण आहार, खाण्याची सवय आणि दिनक्रम याची माहितीही रामदेव बाबांनी दिली आहे. त्यामुळे ज्यांना रामदेव बाबांसारखं फिट राहायचे आहे, त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत रामदेव बाबांनी आपल्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे. 100 वर्षाच्या वयात कुणालाही म्हातारपण आणि आजाराचा सामना करावा लागू नये. त्यासाठी सात्विक आहार आणि योगाभ्यास करणं आवश्यक आहे. प्रत्येकाने दिवसाला कमीत कमी दोन योगासने केली पाहिजे. कारण त्यामुळे शरीर आतून निरोगी आणि तरूण राहतं. लहानपणी एकदा मच्छर चावल्याने ताप आला होता. पण त्यानंतर मला कधीच सर्दी, खोकला, जुलाब आणि खाद्य पदार्थातून विषबाधा झाली नाही, असं रामदेव बाबांनी सांगितलं.

बाबांचा दिनक्रम कसा?

रामदेव बाबांनी त्यांच्या संपूर्ण दिनक्रमाची माहिती दिली आहे. तुम्ही सकाळची सुरुवात कशी करता? तुम्ही काय खाता? आधी काय खाता? शेवटी काय खाता? हे अत्यंत महत्त्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी त्यांनी दोन पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला आहे. या पदार्थांमुळे रोगाला निमंत्रण दिलं जातं. त्यामुळे यापासून दूर राहा, असं त्यांनी म्हटलं आहे.

दिवसाची सुरुवात कशी करतात?

सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. बाबा रामदेव पहाटे 3 वाजता उठतात. रिकाम्यापोटी कोमट पाणी पितात. तो त्यांच्या दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. सर्वांनी ही सवय लावून घ्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर ते अंघोळ करतात. नंतर एक तासभर ध्यानाला बसतात. त्यानंतर मॉर्निंग वॉकला जातात. त्यानंतर लोकांना योग शिकवण्याचं काम करतात. दिवसातून केवळ एक वेळच जेवण घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

किती वेळा जेवावं?

दिवसातून किती वेळा जेवलं पाहिजे? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टच सांगितलं. दिवसातून अनेकवेळा खाल्ल्याने आजारपण येतं. दिवसातून एकदाच जेवल्यावर शरीर चांगलं राहतं. जे लोक अंगमेहनत करतात ते दोनदा जेवू शकतात. जे लोक दिवसातून तीनदा खातात ते आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. आणि दिवसातून चारवेळा खाणं तर सर्वात धोकादायक असतं, असं ते म्हणाले.

सात्त्विक आहार घ्या

रामदेव बाबा दुपारी 11-12च्या दरम्यान जेवण करतात. संध्याकाळी 7 वाजता केवळ फळे खातात. त्यांच्या आहारात 99 टक्के धान्य नसतं. त्यांच्या आहारात अनेक फळ आणि भाज्या असतात. त्यात दुधी भोपळा, दोडका आणि मिक्स भाज्या असतात. ते बटाटा खात नाहीत. 20 वर्षाहून अधिक काळापासून ते धान्य खात नाहीत. कधी कधी बाजरीची भाकर खातात. पण त्यानंतर पुन्हा काही दिवसांसाठी बाजरी खाणँ सोडून देतात.

आहाराची योग्य पद्धत काय?

रामदेव बाबांनी आहार घेण्याची योग्य पद्धतही सांगितली आहे. सर्वात आधी फळ आणि सॅलड सारखे कच्चे पदार्थ खाल्ले पाहिजे. त्यानंतर भाज्या, धान्य आणि शेवटी गोड पदार्थ खाल्ला पाहिजे. पण गोड पदार्थात साखर असू नये. त्यासाठी तुम्ही गोड फळे, सुकलेली फळे, गूळ आदी खाऊ शकता. हा आहार शरीरासाठी उत्तम असतो. त्यामुळे आजार होत नाहीत, असं ते म्हणाले.

2 खतरनाक खाद्यपदार्थ

रामदेव बाबांच्या मते, तांदूळ आणि गहू खाणं धोकादायक असतं. यामुळे अनेक आजार होतात, असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी कपालभाती आणि अनुलोम विलोम प्राणायाम सर्वाधिक शक्तीशाली योगासन असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचा अभ्यास करण्याचा सल्लाही ते देतात. रात्रीच्यावेळी मिठाई, चहा, कॉफी, दही, बटरमिल्क आणि चॉकलेट न खाण्याचा ते सल्ला देतात. ज्या लोकांना झोपेचा त्रास आहे, त्यांनी कांदा खावा. त्यामुळे गाढ झोप येते, असं त्यांनी म्हटलंय.

चांगला आहार कोणता?

कमजोरी दूर करायची असेल तर गाजर, डाळिंब, बीट रूट आणि एलोवेरा खाण्याचा सल्ला ते देतात. मुळा पोट आणि काळजासाठी चांगला असतो. त्यामुळे बॅक्टेरिया वाढतो. सीताफळ खाल्ल्याने कधीच एसीडिटी होत नाही. यात भरपूर कॅल्शियम असते, असं ते म्हणाले.

Source: TV9 Marathi Health

Read full article on TV9 Marathi Health

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language