Hashtagintro

पाकिस्तानचे 12 तुकडे? असीम मुनीर यांचा महाडाव, भुट्टो-शरीफ घराण्यांचा अंत जवळ!

पाकिस्तानचे 12 तुकडे? असीम मुनीर यांचा महाडाव, भुट्टो-शरीफ घराण्यांचा अंत जवळ!

पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय वर्चस्वाचं एक वेगळंच संकट उभं ठाकलं आहे. पाकिस्तानातील अनेक प्रांत वेगळे करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी पाकिस्तानचे अनेक तुकडे करण्याचा महाभयंकर डाव आखला आहे. या प्लाननुसार, सिंधपासून कराचीला वेगळं केलं जाणार आहे. असीम मुनीर असतानाच हे प्रयत्न यशस्वी झाले तर पाकिस्तानातील सर्वात मोठ्या भुट्टो आणि शरीफ घराण्याच्या राजकारणाचा कायमस्वरुपी अंत होणार आहे. मात्र, असं घडण्यापूर्वी पाकिस्तानात मोठा रक्तपात होण्याची शक्यता असून आतापासूनच त्याला कडाडून विरोध होत आहे.

बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपुल्स पार्टीने यावर कठोर शब्दात इशारा दिला आहे. सिंध प्रांताच्या विभाजनास त्यांनी विरोध केला आहे. बिलावल यांच्याशिवाय कराचीत राहणारे पश्तून, पंजाबी, बलूचांनीही या विभागणीला विरोध केला आहे. सिंध प्रांतावर भुट्टो कुटुंबाचं नेहमी वर्चस्व राहिलं आहे. मात्र, आता याच प्रांताचे चार तुकडे केल्यास भुट्टो कुटुंबाची राजकीय ताकद कमी होणार आहे.

पाकिस्तानात राडा

सिंध प्रांतातील प्रमुख समुदायांमध्ये बिलावल भुट्टो यांच्या पीपीपी पार्टीची मजबूत पकड आहे. पीपीपी आपल्यासाठी सुरक्षेचं कवच आहे, असं या समुदायाचं म्हणणं आहे. तसेच येथील हिंदू समुदायाबाबतही पीपीपीची भूमिका नरमाईची राहिली आहे. दुसरीकडे शहबाज शरीफ यांचं सरकार सिंध प्रांताच्या विभागाणीसाठी जनमत तयार करण्याचा विचार करत आहेत. पण सिंधमधील वेगवेगळ्या शहरातील महापौरांनी त्याला विरोध केला आहे.

जनमत चाचणीने प्रांताची विभागणी होणार नाही. तर विधानसभेत दोन तृतियांश बहुमत प्रस्ताव मंजूर झाला पाहिजे. काही महिन्यांपूर्वी सिंध विधानसभेतील बकायता प्रांताच्या विभागणीच्या विरोधता प्रचंड बहुमताने प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता, असं भुट्टोंच्या पार्टीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. प्रांतातील कृषी व्यवस्थेची वाट लागली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, असं विभागणीच्या बाजूचे नेते बोलत आहेत. तर भुट्टो यांचा पक्ष आपल्या कामगिरीचा पाढाच वाचत आहे.

दोन घराण्यांचा अंत होणार?

पाकिस्तानच्या राजकारणात भुट्टो आणि शरीफ घराण्याचं अनेक दशकांपासून वर्चस्व राहिलं आहे. सिंधमध्ये भुट्टो कुटुंबाचं नाणं चालतं. तर पंजाबमध्ये शरीफ घराण्याचा बोलबाला आहे. असीम मुनीर यांना मात्र पाकिस्तानच्या चार प्रांतांना 12 भागांमध्ये विभागायचे आहेत. म्हणजे प्रत्येक प्रांताचे तीन तुकडे करायचे आहेत. असं केल्याने पाकिस्तानातील भुट्टो आणि शरीफ घराण्याच्या वर्चस्वाला सुरुंग लागणार आहे. पर्यायाने राजकीय पक्षच कमजोर झाल्याने सैन्याचं बळ वाढणार आहे. त्यामुळे त्यांना आव्हान देणाऱ्यांची धडगत राहणार नाही.

कराची वेगळी झाल्यास काय होईल?

कराची सिंध प्रांतातील सर्वात श्रीमंत शहर आहे. कराचीला पाकिस्तानची मुंबई म्हटलं जातं. कराचीला वेगळं करणं म्हणजे सिंध सरकारमधील प्राण काढून घेणं आहे. कराची वेगळं झाल्यावर सिंध सरकार असलं काय आणि नसलं काय त्याला काही महत्त्व उरणार नाही. कराचीशिवाय सिंधला अर्थच उरत नाहीये. पंजाब प्रांतातही असचं होणार आहे. पाकिस्तान आधीच अत्यंत छोटा देश आहे. त्यात आता 12 प्रांताची विभागणी झाल्यास जो नवीन मुख्यमंत्री होईल, त्याच्याकडे काही खास अधिकार राहणार नाही. एखाद्या महापालिकेच्या महापौरासारखी त्याची अवस्था होणार आहे.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language