अभिनेत्री या कायम रुपेरी पडद्यावर कधी रोमँटिक, कधी भावनिक तर कधी अॅक्शन सीन देताना दिसतात. अभिनेत्री नेहमी त्यांचा संपूर्ण जीव ओतून भूमिका साकारत असतात. पण कधी कधी अभिनेत्री हे सीन शूट करताना अन्कफर्टेबल असतात. बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने असाच एक किस्सा सांगितला आहे. आता नेमकं काय घडलं होतं? चला जाणून घेऊया…
आम्ही अभिनेत्री राधिका आपटेविषयी बोलत आहोत. राधिकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये चित्रपटसृष्टीमधील अतिशय वाईट अनुभव सांगितला आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी तिच्याकडे अत्यंत विचित्र मागणी केली होती.
तू ब्रा न घालता फक्त शर्ट घाल. शर्टाचे वरचे बटण उघडे ठेव आणि अॅक्शन सीन शूट करु शकते? अशी मागणी राधिकाकडे एका दिग्दर्शकाने केली होती. या मागणीला विरोध केल्यानंतर तिला अंतर्वस्त्रांमध्ये एक सीन शूट करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला.
राधिका एका मुलाखतीमध्ये म्हणाली की, “त्यांनी मला विचारले, 'तू ब्रा न घालता फक्त शर्ट घालून बटण उघडे ठेवशील का?' यावर मी त्यांना थोडं फिजिक्स समजून घ्या, असे सांगितले. मग ते म्हणाले तू फक्त अंतर्वस्त्रामध्ये हा सीन करशील का? कारण अॅक्शन सीन्स करताना काय होईल हे सर्वांनाच समजते. तर हो, असा प्रकार खरंच घडला होता.”
अशा गोष्टी इंडस्ट्रीमध्ये सगळीकडेच घडतात असे नाही असे देखील राधिका स्पष्ट म्हणाली. सगळेच असे नसतात. 10 पैकी फक्त एका सेटवर असा अनुभव येतो असे राधिका आपटे म्हणाली.
Source: TV9 Marathi Entertainment





