Hashtagintro

भारताचं टेन्शन आणखी वाढलं, होर्मुझमधील 9 जहाजांवर मोठं संकट, सरकार अलर्ट

भारताचं टेन्शन आणखी वाढलं, होर्मुझमधील 9 जहाजांवर मोठं संकट, सरकार अलर्ट

होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या जवळील भारतीय जहाजांच्या सुरक्षेवरून केंद्र सरकार अलर्ट झालं आहे. या भागातील भारतीय झेंडे असलेल्या 9 जहाजांवर सरकारचं विशेष लक्ष आहे. होर्मुझमधील जहाजांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सागरी सुरक्षा मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय जहाज आणि खलाशांच्या सुरक्षेविषयी देखील सोनोवाल यांनी बैठकीत उपस्थितांशी चर्चा केली.

केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. सागरी प्रशासन महासंचालनालयाला संवेदनशील सागरी क्षेत्रात गस्त वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोनोवाल यांनी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत. संवेदनशील, धोकादायक समुद्री भागातील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षेशी संबंधित सूचना देण्याच्या देण्यासही सांगण्यात आलं आहे. त्याबरोबर शिपिंग कंपनी आणि जहाजांच्या संचालकांशी नियमित संपर्क साधण्यासही सांगण्यात आलं आहे.

सोनोवाल यांनी वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी झालेल्या व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांचा निषेध नोंदवला. तसेच या घटनेवरून चिंता देखील व्यक्त केली. जहाजांवर हल्ले होत असल्याने खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला.  मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारताचा झेंडा असलेल्या जहाजांचं आतापर्यंत होर्मुझमधून 86 वेळा दळवळण झालं आहे. जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी मंत्रालयाने एक ट्रॅकिंग मॉड्यूल विकसित केलं आहे. या मॉड्युलच्या माध्यमातून होर्मुझच्या सामुद्रधुनीतील 800 हून अधिक जहाजांवर लक्ष ठेवली जाते.

होर्मुझच्या पूर्वेकडील ओमानच्या आखातात 200 हून अधिक जहाजांवर लक्ष ठेवलं जातं. या माध्यमातून भारतीय जहाज,खलाशांवरही लक्ष ठेवण्यात येते. दरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीत एलपीजी टँकर जहाजावर 16 नोव्हेंबर रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर एक भारतीय खलाशी बेपत्ता झाला होता. तर दोघे जण बेपत्ता झाले होते. या जहाजांवरील 24 भारतीय नागरिकांपैकी 21जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. भारताने या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध नोंदवला. ओमानमधील भारतीय दूतावास हे तेथील अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहे. जखमी खलाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language