Hashtagintro

भारत जिंकला, नितीश-तिलक आनंद साजरा करणार तेवढ्यात सुरक्षा रक्षकांची मैदानात एन्ट्री; खेळाडूंना घेरलं, कारण… नेमकं काय घडलं?

भारत जिंकला, नितीश-तिलक आनंद साजरा करणार तेवढ्यात सुरक्षा रक्षकांची मैदानात एन्ट्री; खेळाडूंना घेरलं, कारण… नेमकं काय घडलं?

ईस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर खेळल्या गेलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्यात उत्कंठा शिगेला पोहोचली होती. भारतीय संघाने न्यूझीलंडच्या हातून विजय हिसकावून घेतला. सामन्यादरम्यान दोनदा भारताच्या विजयाची शक्यता केवळ चार टक्के होती. म्हणजेच, दोन वेळा विजयाचा अंदाज वर्तवणाऱ्या प्रणालीने न्यूझीलंडच्या विजयाची शक्यता ९६ टक्के दर्शवली होती. मात्र शेवटच्या पाच षटकांमध्ये तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी बाजी पलटवून भारताला विजय मिळवून दिला. यानंतर मैदानावर एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. सामना संपताच सर्व सुरक्षा रक्षक मैदनात धावले. त्यांनी खेळाडूंना घेरलं. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

१८१ धावांचे लक्ष्य गाठताना भारताची ११ षटकांत ५ गडी बाद ७१ धावांवर होती. भारताचे सर्व प्रमुख फलंदाज बाद झाले होते. सर्वांच्या आशा नमन धीरवर होत्या. त्याला जीवदान मिळताच त्याने पहिल्या टी२० प्रमाणेच किवी गोलंदाजांना चोपायला सुरुवात केली. जेव्हा नमन १७ चेंडूंमध्ये ३१ धावांवर बाद झाला, तेव्हा सामना पुन्हा न्यूझीलंडच्या बाजूने झुकला. नितीश रेड्डी १३ चेंडूंत २६ धावांवर नाबाद राहिले. तिलक वर्मा २६ चेंडूंत ५१ धावांवर नाबाद राहिले. मात्र एके वेळी तिलक ९ चेंडूंत केवळ १० धावांवर होते. आपल्या दमदार खेळीसाठी तिलक यांना सामनावीर पुरस्कार मिळाला. यानंतर नितीश-तिलक आनंद साजरा करणार तेवढ्यात सुरक्षा रक्षक मैदानात आले.

भारताच्या विजयानंतर एक अनपेक्षित घटना घडल्याचे दिसून आले. दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध नितीश रेड्डीने विजयी फटका मारताच सुरक्षा कर्मचारी मैदानात धावून आले. त्यांनी लगेचच नितीश रेड्डी आणि तिलक वर्माला वेढून घेतले. ते इतक्या वेगाने खेळाडूंपर्यंत पोहोचले की, आनंद साजरा करायला मिळण्याआधीच तिलक आणि नितीश सुरक्षा रक्षकांच्या वेढ्यात अडकले. याआधीच्या सामन्यात विजयाच्या क्षणी एक चाहता मैदानात शिरला होता. म्हणूनच यावेळी सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क होती. याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात तिलकने सहा चौकार आणि एका षटकारासह २६ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावा केल्या. भारताला विजयासाठी शेवटच्या तीन षटकांत म्हणजेच १८ चेंडूंमध्ये ४६ धावांची गरज असताना त्याची ही स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. हा २६वा टी२० सामना होता. ज्यात तिलक नाबाद राहिला आणि संघाने विजय मिळवला. यामध्ये आयपीएल आणि इतर टी२० सामन्यांचा समावेश आहे. तिलकच्या नाबाद खेळीने त्यांच्या संघाला २६ वेळा विजय मिळवून दिला आहे. २०२५ च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना नाबाद ६९ धावा करून तिलकने अशीच कामगिरी केली होती.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language