Hashtagintro

भुवनेश्वर कुमारच्या अपयशाचे कारण काय? प्रशिक्षकाने दिला मोलाचा सल्ला, म्हणाले…

स्विंगचा किंग असलेल्या भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीची जादू काही पहिल्या दोन टी20 सामन्यात चालली नाही. खरं तर चार वर्षानंतर टीम इंडियात त्याचं पुनरागमन झालं आहे. आयपीएल स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीमुळे त्याला संघात संधी मिळाली आहे. पण न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यात काही खास करू शकला नाही. दोन्ही सामन्यात प्लेइंग 11चा भाग होता. पण त्याच्या खात्यात फक्त एक विकेट आली. इतकंच काय तर खोऱ्याने धावा दिल्या. त्याचा इकोनॉमी रेट 10 पेक्षा अधिकचा होता. या निराशाजनक कामगिरीनंतर भारताचे गोलंदाज प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी एक सल्ला त्याला दिला आहे. तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी मॉर्ने मॉर्केल म्हणाला की, भुवीने अपेक्षा बाजूला ठेवून आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत केलं पाहीजे. त्याला कोणत्याही गोष्टीचा पाठलाग करण्याची गरज नाही.

काय म्हणाले मॉर्ने मॉर्केल?
मॉर्ने मॉर्केल म्हणाले की, ‘मला त्याच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे. मी हे यासाठी म्हणत आहे कारण चार वर्षांनंतर पुनरागमन केल्यामुळे त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील. त्याने आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.’ मॉर्केल पुढे म्हणाले की, ‘पहिली गोष्ट म्हणजे, अपेक्षांच्या दबावावर मात करणे हे त्याच्यापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, त्याला सरावासाठी खूप कमी संधी मिळाली आहे. त्याच्याकडे सर्व कौशल्ये आणि अनुभव आहे, पण त्याला काही सामन्यांमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिली पाहिजे. त्याला बाह्य घटकांकडे दुर्लक्ष करून आपला खेळ खेळावा लागेल.’
https://www.prahaar.in/2026/10/26/ipl-2027-which-players-will-the-teams-retain-november-15-2026-is-the-deadline-for-retention/
भुवनेश्वर कुमारने पहिल्या टी20 सामन्यात चार षटकं टाकली आणि 49 धावा दिल्या. त्याच्या खात्यात एकही विकेट आली नाही. दुसऱ्या टी20 सामन्यात एक विकेट काढली, पण 50 धावा दिल्या. त्यामुळे भुवनेश्वर कुमार महागडा गोलंदाज ठरला आहे. मॉर्ने मॉर्केल यांनी भुवनेश्वर कुमारला सल्ला देताना सांगितलं की, ‘”अगदी सुरुवातीपासूनच त्याच्यासाठी संदेश स्पष्ट आहे. कशाचाही पाठलाग करू नको. स्वतःमध्येच रमून राहा. अपेक्षा असतील, पण प्रत्येक सामन्यात तुम्ही अधिक चांगले व्हाल आणि प्रत्येक सामन्यात तुम्हाला तुमची लय सापडेल. त्यामुळे कोणत्याही बाह्य गोष्टींचा विचार करू नका. स्वतःमध्येच रमून राहा आणि त्याच्याशी एकरूप व्हा.’

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language