
आपल्या देशात अनेक छोटे छोटे गाव आहेत. ही गावं जगावेगळी आहेत. त्यांची स्वत:ची ओळख आहे. स्वत:ची भाषा आहे. आपल्या आपल्या पंरपरा आणि रितीरीवाज आहेत. त्यामुळे भारतातील या गावांना हमखास भेट दिली पाहिजे. देशात असं एक गाव आहे, ज्याची माहिती आणि वेगळंपण ऐकून तुम्ही थक्क व्हाल. हिमाचल प्रदेशातील हे गाव आहे. या गावात एक विचित्र परंपरा आहे. या गावातील परंपरेनुसार येथील महिला एकावेळी चार लग्न करू शकतात. या गावाला भारताचं शेवटचं गावही म्हटलं जातं. या गावातील विचित्र प्रथा ऐकून अनेक लोक या गावाला भेट देण्यासाठी येतात. गावातील सामाजिक व्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
हे गाव हिमाचल प्रदेशात आहे. छितकुल असं या गावाचं नाव आहे. हिमाचलच्या सांगलापासून जवळपास 28 किलोमीटर अतंरावर हे गाव आहे. या गावातील महिलांना संपूर्ण लग्न स्वातंत्र्य आहे. त्या एकाचवेळी चार विवाह करू शकतात. त्यासाठी या महिलांवर कोणतीही बंधनं घातली जात नाहीत. हजारो वर्षापासूनची ही गावातील परंपरा आहे. त्यामुळे या अनोख्या परंपरेचं सर्वांनाच कुतुहूल वाटत आलं आहे.
टोपी दिसली की समजायचं…
छितकुल गावातील या अनोख्या परंपरेनुसार जेव्हा पत्नीला आपल्या एखाद्या नवऱ्यासोबत एकांत हवा असतो, तेव्हा पती खोलीच्या बाहेर एक टोपी ठेवतो. दुसऱ्या पतीने डिस्टर्ब करू नये म्हणून ही टोपी ठेवली जाते. यावरून पत्नीसोबत तिचा एक नवरा असल्याचे संकेत मिळतात. या गोष्टीवर गावातील कुणाचाच आक्षेप नाहीये. ही गोष्ट सामान्य पद्धतीने घेतली जाते. विशेष म्हणजे या गावात लग्नाच्या वेळी सातफेरे घेत नाहीत. उलट त्याऐवजी देवाला बळी दिला जातो.
अत्यंत सुंदर गाव
छितकुलला भारताचं सर्वात शेवटचं गाव म्हटलं जातं. जर तुम्हाला देशातील शेवटचा बस स्टॉप, शेवटची शाळा, शेवटचं पोस्ट ऑफिस पाहायचं असेल तर तुम्ही या गावात फिरायला येऊ शकता. या शिवाय हे गाव हिमाचलच्या डोंगरदऱ्यात वसलेलं आहे. चोहो बाजूने डोंगर आहे. खळखळ वाहणाऱ्या नद्या आहे. गर्द झाडी आहे. त्यामुळे तुम्हाला फिरण्यासाठी शांत आणि सुंदर जागा हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. छितकुल हा एक परफेक्ट टुरिस्ट स्पॉट आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गावातील लोक अत्यंत प्रेमळ आहेत. या गावातील परंपरा अनोख्या आहेतच. पण येथील लोकांची वेषभूषाही वेगळी आहे.
Source: TV9 Marathi National
