Hashtagintro

विराट कोहलीला नेट्समध्ये घाम फोडणारा नवा गोलंदाज! युवा वेगवान गोलंदाजाच्या माऱ्याने किंग कोहलीही वैतागला?

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली मैदानावर भल्याभल्या गोलंदाजांची धुलाई करतो. मात्र, आगामी भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेपूर्वी सरावादरम्यान एका युवा भारतीय वेगवान गोलंदाजाने कोहलीला चांगलेच अडचणीत आणल्याची चर्चा रंगली आहे. नेट्समध्ये या गोलंदाजाच्या भेदक माऱ्याचा सामना करताना कोहलीला अनेकदा चेंडू खेळण्यात अडचणी आल्या. त्याच्या गोलंदाजीमुळे कोहली काहीसा वैतागल्याचे वृत्त समोर आले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिका संपत असताना आता सर्वांचे लक्ष आगामी वनडे मालिकेकडे लागले आहे. या मालिकेत विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल यांसारखे दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार आहेत. पहिल्या वनडे सामन्याला अवघे 3 दिवस शिल्लक असताना भारतीय फलंदाजांनी नेट्समध्ये कसून सराव केला.
या सराव सत्रात युवा वेगवान गोलंदाज आकिब नबी, अंशुल कंबोज आणि गुरनूर ब्रार यांनी वरिष्ठ फलंदाजांसमोर तगडे आव्हान उभे केले. गुरनूर ब्रारने आपल्या उंचीचा फायदा घेत खेळपट्टीवरून अतिरिक्त उसळी मिळवली. त्यामुळे फलंदाजांना आखूड टप्प्याच्या चेंडूंचा सामना करताना सतर्क राहावे लागले. अंशुल कंबोजने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत फलंदाजांना अडचणीत आणले. मात्र, सर्वाधिक प्रभाव पाडला तो आकिब नबीने. ‘रेव्हस्पोर्ट्स’च्या वृत्तानुसार, नबीने विराट कोहलीला वारंवार चकवले. त्याने दोन्ही बाजूंनी स्विंग होणारे चेंडू टाकत कोहलीच्या फलंदाजीची कसोटी पाहिली. त्याचे काही चेंडू कोहलीच्या बॅटला हुलकावणी देत थेट पॅड आणि मांडीच्या पॅडवर आदळले. त्यामुळे सरावादरम्यान कोहली काहीसा अस्वस्थ झाल्याचे सांगितले जात आहे.
https://www.prahaar.in/2026/11/01/aakash-chopra-slams-vaibhav-suryavanshi-demands-he-be-sent-home-from-team-india-and-advises-him-to-play-ranji-trophy-cricket/
विशेष म्हणजे, नबीने अलीकडेच न्यूझीलंडमधील लिंकन येथे इंडिया ‘अ’ संघाकडून पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात प्रभावी कामगिरी केली होती. दुखापतग्रस्त प्रसिद्ध कृष्णाच्या जागी त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, कोहलीने काही उत्कृष्ट फटके मारत आपली फलंदाजीची लयही दाखवून दिली. सरावादरम्यान रोहित शर्मासोबत त्याची चांगली गट्टी पाहायला मिळाली. रोहितने आक्रमक फलंदाजीपेक्षा बचावात्मक खेळावर भर दिला. केएल राहुलनेही नंतर सरावात सहभाग घेतला, तर ऋतुराज गायकवाडनेही वेगवान गोलंदाजांचा सामना केला. पहिल्या वनडेपूर्वी झालेल्या या सराव सत्रामुळे भारतीय फलंदाजांना खेळपट्टीचा अंदाज घेण्याची आणि वेगवान गोलंदाजीविरुद्ध तयारी करण्याची चांगली संधी मिळाली आहे. आता प्रत्यक्ष सामन्यात युवा गोलंदाज आकिब नबीला संधी मिळते का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language