Hashtagintro

विराट, रोहितचा शेवटचा वनडे सामना, न्यूझीलंडमध्ये वातावरण भावुक, दोघांनीही मानले फॅन्सचे आभार अन्…

विराट, रोहितचा शेवटचा वनडे सामना, न्यूझीलंडमध्ये वातावरण भावुक, दोघांनीही मानले फॅन्सचे आभार अन्…

टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडला आधी टी20 अन् त्यानंतर वनडे सीरीजमध्ये देखील धूळ चारून मालिका आपल्या खिशात घातली आहे. पाच टी20 सामन्याची मालिका भारताने 3-2 ने जिंकली तर आता वनडे मालिका देखील 3-1 च्या फरकाने जिंकली आहे. रविवारी न्यूझीलंडच्या माउंट माउंगानुईमध्ये न्यूझीलंड आणि इंडियामध्ये पाचवा वन डे सामना पार पडला. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने हा सामना 22 धावांनी जिंकला. न्यूझीलंडमध्ये भारताचे स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा हा शेवटचा सामना होता. या सामन्यानंतर दोघंही चांगलेच भावुक झाल्याचं पाहायला मिळालं, दोघांनीही आपल्या फॅन्सचे आभार मानले.

रोहित शर्मा आणि विरोट कोहली हे आपल्या शेवटच्या न्यूझीलंड दैऱ्यावर आले होते. दोन्ही फलंदाजांनी या आधीच टी20 आणि टेस्टमधून रिटायरमेंट घेतली आहे. त्यांनी आता आपला सर्व फोकस फक्त वन डे सामन्यांवरच केंद्रीत केला आहे. या दोघांचाही हा शेवटचा न्यूझीलंड दौरा होता. मात्र दोघांनाही आपल्या शेवटच्या सामन्यामध्ये मोठी खेळी करण्यात यश आलं नाही. रोहित शर्मा 13 बॉलमध्ये सात रन करून बाद झाला तर विराट कोहली 07 बॉलमध्ये 05 रन करून बाद झाला. मात्र हा त्यांचा न्यूझीलंडमधील शेवटचा सामना असल्यामुळे त्याचे हजारो फॅन्स हा समाना पाहाण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते. मॅच संपल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या फॅन्सचे आभार मानले आहेत.

शेवटच्या सामन्यात 22 धावांनी विजय

पाचव्या आणि शेवटच्या न्यूझीलंड विरोधातील सामन्यामध्ये भारताने 22 धावांनी विजय प्राप्त केला. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंड समोर 209 धावांचं आव्हान ठेवलं होतं. परंतु न्यूझीलंडचा संघ लक्ष्याचा पाठलाग करताना 187 धावांवरच ऑलआऊट झाला. भारताने हा सामना 22 धावांनी जिंकला आहे. यासोबतच भारताने मालिका देखील आपल्या खिशात घातली होती. चौथ्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडकडून मोठा पराभाव झाला होता. मात्र त्यानंतर टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं, सामना जिंकून शेवट गोड केला.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language