Hashtagintro

शुभमनसाठी अबरार अहमदशी भिडली, पण गिलच्या एका उत्तराने पाकिस्तानी महिला फॅनचं मन दुखावलं; व्हिडीओतून व्यक्त केली नाराजी

शुभमनसाठी अबरार अहमदशी भिडली, पण गिलच्या एका उत्तराने पाकिस्तानी महिला फॅनचं मन दुखावलं; व्हिडीओतून व्यक्त केली नाराजी

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका ४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. भारतीय संघाने ऑकलंडमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. शुभमन गिल पहिल्या तीन सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहे. परंतु शेवटच्या दोन सामन्यांमध्ये तो संघाचा भाग नसेल. त्या सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र यावेळी एक व्हिडिओ समोर आला आहे. एका पाकिस्तानी महिला चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने दावा केला आहे की, गिलने तिचे मन दुखावले आहे.

एकदिवसीय मालिकेपूर्वी शुभमन गिलबद्दल एक गंभीर दावा केला जात आहे. एका महिला चाहत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तिने दावा केला आहे की, ती गिलसोबत फोटो काढणार नाही. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात रंजक आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, ही तीच महिला चाहती आहे जिने काही काळापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान शुभमन गिलच्या मुद्द्यावरून पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदसोबत जोरदार वाद घातला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Khan (@farhankhannz)

एका पाकिस्तानी महिला चाहत्याने सांगितले की, तिने शुभमन गिलच्या बाबतीत आपला देशबांधव अबरार अहमदला जाब विचारला होता, पण गिलच्या उत्तराने तिला खूप वाईट वाटले. तिने अबरारला काय म्हटले याचा एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. तिने व्हिडिओमध्ये एक जुनी क्लिपसुद्धा जोडली आहे. ज्यामध्ये ती अबरार अहमदला विचारताना दिसत आहे, तुम्ही शुभमन गिलला कोणते हावभाव करत होता? तुम्ही तसे का केले?

सीमारेषेजवळ उभा असलेला अबरार हे सर्व ऐकत होता. त्यानंतर ताज्या व्हिडिओमध्ये त्या महिलेने सांगितले की, ती गिलसाठी अबरारला ओरडली होती. पण नंतर गिलने तिचे मन दुखावले. मी न्यूझीलंडमध्ये शुभमन गिलसाठी पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमदसोबत भांडले. जेव्हा मी गिलला सांगितले की मला फोटो हवा आहे, तेव्हा तो ‘सॉरी’ म्हणाला. ही चांगली गोष्ट नाही.

तिच्या मते, गिलचे हे वर्तन तिला अजिबात आवडले नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्यादरम्यान पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदने शुभमन गिलला बाद केल्यानंतर त्याला आक्रमकपणे ‘सेन्ड-ऑफ’ दिला.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language