Hashtagintro

संघर्षाच्या दिवसांनंतर मराठी अभिनेत्याची कोट्यवधींची झेप; मुंबईत तब्बल 16 कोटींचं आलिशान घर खरेदी

संघर्षाच्या दिवसांनंतर मराठी अभिनेत्याची कोट्यवधींची झेप; मुंबईत तब्बल 16 कोटींचं आलिशान घर खरेदी

अभिनेता हर्षवर्धन राणे सध्या त्याच्या चित्रपटांमुळेच नव्हे, तर खासगी आयुष्यातील एका मोठ्या घडामोडीमुळे चर्चेत आला आहे. ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या हर्षवर्धनने मुंबईत आणखी एक आलिशान घर खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या घराची किंमत तब्बल 15 ते 16 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे, मुंबईत त्याच्या नावावर आधीच दोन फ्लॅट आहेत. त्यामुळे अभिनेत्याच्या या नव्या प्रॉपर्टी डीलची मनोरंजनविश्वात चर्चा रंगली आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, हर्षवर्धन राणेने मुंबईतील लोटस बिल्डर्सच्या ‘अमाल्फी’ या प्रोजेक्टमध्ये नवीन घर खरेदी केलं आहे. या घराची किंमत जवळपास 15 ते 16 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या घराचं क्षेत्रफळ, इंटेरिअर आणि इतर सुविधांबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही.

याआधीही हर्षवर्धनने मुंबईतील मड आयलंड परिसरात दोन फ्लॅट खरेदी केले होते. या दोन्ही फ्लॅटची एकत्रित किंमत अंदाजे 10 ते 12 कोटी रुपये असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे नव्या घराच्या खरेदीनंतर त्याच्या रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. हर्षवर्धन राणेच्या करिअरचा प्रवास सोपा नव्हता. त्याने 2010 मध्ये ‘थकिता थकिता’ या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्याआधी त्याने छोट्या पडद्यावरही काम केलं होतं. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्याने साकारलेली इंदर ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Harshvardhan Rane (@harshvardhanrane)

विशेष म्हणजे, सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल न करू शकलेला हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर प्रचंड लोकप्रिय झाला. री-रिलीजदरम्यान मिळालेल्या प्रतिसादामुळे हर्षवर्धनच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. त्यानंतर ‘एक दिवाने की दिवानियत’ या चित्रपटातूनही त्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. हर्षवर्धनचे वडील विवेक राणे हे मराठी असून व्यवसायाने डॉक्टर आहेत, तर आई स्वर्णरेखा राव या तेलुगू आहेत. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता आणि त्याचं संगोपन वडिलांनी केलं. त्यामुळे हर्षवर्धनला मराठी आणि तेलुगू अशा दोन्ही संस्कृतींचा वारसा लाभला आहे.

कामाच्या आघाडीवर हर्षवर्धन सध्या व्यग्र आहे. जॉन अब्राहमसोबत तो ‘फोर्स 3’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट 19 मार्च 2027 रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय राम गोपाल वर्मा यांच्या ‘पोलिस कंपनी’ या चित्रपटातही तो दिसणार आहे. हा चित्रपट 4 जून 2027 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language