Hashtagintro

Prajakta Mali : डेंजर ब्रेकअप्स, टोमणे, पाणउतारा, अपमान अन्…प्राजक्ता माळीनं सांगितला संघर्षकाळ

Prajakta Mali : डेंजर ब्रेकअप्स, टोमणे, पाणउतारा, अपमान अन्…प्राजक्ता माळीनं सांगितला संघर्षकाळ

प्राजक्ता माळी ही मराठी इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून तिनं स्वबळावर इंडस्ट्रीत स्थान निर्माण केलं आहे. पण, अभिनेत्रीचा हा प्रवास सोपा नव्हता. एका मुलाखतीत प्राजक्ता माळीनं तिच्यासंघर्षाबद्दल सांगितलं होतं. प्राजक्ता करिअरच्या सुरुवातीच्या काळात पुण्याहून मुंबई असा दररोज प्रवास करायची. प्राजक्ता म्हणालेली की, ‘मी ना खूप काही बघितलंय. वयाच्या १७व्या वर्षानंतर खूप वाईट काळ मी पाहिलाय. त्यामुळे मी स्ट्रॉन्ग गर्ल बनले आणि त्यानंतर मला कळलं की, नाही तुम्ही इतकं शांत राहिलात, तर तुम्ही कुठेच नाही पोहचू शकणार आणि एवढं तर मी नाही राहू शकत.’

प्राजक्तानं सांगितला संघर्षकाळ

‘मी आलीये तर आयुष्य जगायला तर बँग ऑन केलंच पाहिजे, असं नाही जाऊ शकत. डेंजर डेंजर ब्रेकअप्स पाहिलेत मी. त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात, एक कोट आहे जे मला खूप आवडतं, ते म्हणजे Strong Souls Chooses the hardest life. त्यामुळे तशा पद्धतीनं काही स्ट्रगल ओढवून घेतले. माझा पुणे-मुंबई स्ट्रगल खूप मोठा होता. फॅमिली सपोर्ट पण मेंटली होता पण, ते सत्यात उतरवताना मनुष्यबळ नाही. आजही मुंबईत माझं कोणी नातेवाईक राहत नाही, आजही नाहीये. इमोशनल, मेंटल, आर्थिक स्ट्रगल. खूप धक्के, टोमणे, पाणउतारा, अपमान, ग्रुपिझम, कास्टिझम सगळं काही होतं आणि त्यातून मी घडत गेले. ‘जुळून येती रेशीमगाठी’नंतर मी जागेवर आले, त्यानंतर मी काथ टाकली. म्हणजे मेघना, जशी जशी फुलत गेली, तशी तशी मी झाले. त्या भूमिकांनीही मला खूप शिकवलं.’

‘सुरुवातीला मी डान्स शोमध्ये परफॉर्म केलंय. तेव्हा, मी पुणे-मुंबई प्रवास केला. त्यानंतर मी गुड मॉर्निंग होस्ट केलं, तेव्हा सकाळी मी पहाटे चारला उठायचे, तिथून सायनला जायचे. दिवसभर सात एपिसोडचं शूट करायचे, संपवायचे. तिथून चेंबूरवरून बस पकडायचे आणि पुन्हा पुण्याला जायचे. त्या शोमधून मिळालेल्या पैशातून माझं पुढचं शिक्षण झालंय.’ असं प्राजक्तानं शेवटी सांगितलं. ‘राजश्री मराठी‘ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता माळी बोलत होती.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language