Hashtagintro

साप वांरवार घरात येत आहेत, मग आदिवासी लोकांची ही सोपी ट्रिक कराच, पुन्हा आयुष्यात कधी साप दिसणार नाही

साप वांरवार घरात येत आहेत, मग आदिवासी लोकांची ही सोपी ट्रिक कराच, पुन्हा आयुष्यात कधी साप दिसणार नाही

साप म्हटलं की अनेकांना भीती वाटते, अनेकदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळातून जमिनीवर येण्याचं प्रमाण वाढतं, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उन्हाळ्यात उष्णता प्रचंड प्रमाणात असते, बिळात सापांना या उष्णतेचा त्रास होतो, त्यामुळे ते बिळातून बाहेर पडतात, आणि जिथे थंडावा आहे, अशा जागी येऊन बसतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा साप हे झाडाखाली आढळून येतात. अथवा तुम्ही जर उन्हाळाच्या दिवसांमध्ये तुमच्या बागेतील झाडांना पाणी दिलं असेल तर अशावेळी ते थंडाव्यासाठी बाहेर देखील लपून बसू शकतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशा ठिकाणी सतर्क राहणं गरजेचं असतं.

दुसरं म्हणजे पावसाळ्यात सापांच्या बिळात पाणी शिरतं, पाण्यामुळे साप बाहेर जमिनीवर येतात. तसेच पावसाळ्यात अनेकदा मातीमुळे त्यांची बिळं देखील बुजली जातात. त्यामुळे पावसाळ्यात साप सुरक्षित जागेच्या शोधात असतात. अशावेळी ते अनेकदा तुमच्या घरात देखील घुसू शकतात. शक्यतो जिथे आर्द्रता जास्त आहे, तसेच लपण्यासाठी जागा आहे, अशा ठिकाणी साप आपला डेरा टाकतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये देखील विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. साप घरात येऊ नये, यासाठी घराचा परिसर स्वच्छ ठेवणं, कुठेही अडचण निर्माण होणार नाही, याकडे लक्ष देणंच महत्त्वाचं आहे. परंतु अशा देखील काही ट्रीक आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही सापांना तुमच्या घरापासून दूर ठेवू शकतात.

आदिवासी लोक आजही या ट्रीकचा उपयोग करतात. आदिवासी लोक अनेकदा दुर्गम भागात, पाड्यावर अथवा जंगलामध्ये वस्ती करून राहतात. अशा ठिकाणी तर सापाची भीती आणखी वाढते, साप आपल्या घरात येऊ नये, यासाठी आदिवासी लोक आपल्या घराभोवती काटे असलेले झाडं लावतात. जसं की बोरीचे झाडं, किंवा निवडुंगाचं झाड, सापांची त्वचा ही खूप सेंसिटिव्ह असते, सापांना या काट्यांचा त्रास होतो. त्यामुळे ते शक्यतो अशा ठिकाणी जात नाहीत आणि सापांपासून आपला बचाव होतो. जिथे अशा वनस्पती आहेत, अशा ठिकाणावरून साप नेहमी दूरच राहतो.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language