Hashtagintro

ही आहे देशातील सर्वात महागडी मिठाई, एका किलोच्या किंमतीमध्ये येईल नवी कोरी बाईक

ही आहे देशातील सर्वात महागडी मिठाई, एका किलोच्या किंमतीमध्ये येईल नवी कोरी बाईक

सणोत्सवाचा काळ सुरू आहे. दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सणाच्या काळात बाजारात विविध प्रकारच्या मिठाई विक्रीसाठी येत असतात. दिवाळीच्या काळात तर बाजारात मिठायांची मोठी रेलचेल असते. कोणी काजू कतलीची खरेदी करतं, तर कोणी बेसनाचे लाडू, कोणाला रसमलाई आवडते तर कोणाला पुरणपोळी. दिवाळीच्या काळात मिठाईचे दर देखील वाढतात. मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल, देशात अशी देखील एक मिठाई आहे, ज्या एका किलो मिठाईची किंमत नव्या बाईकच्या किंमती एवढी आहे. याचाच अर्थ असा की तुम्ही एक किलो मिठाईच्या किमतीमध्ये एक नवी कोरी बाईक खरेदी करू शकता. ही मिठाई राजस्थानमधील जयपूरमध्ये तयार केली जाते. एका रिपोर्टनुसार या मिठाची किंमत तब्बल 1 लाख 11 हजार रुपये प्रति किलो एवढी आहे. एवढ्या किमतीमध्ये तर तुम्ही नवी बाईक देखील खरेदी करू शकतात.

काय आहे खास?

स्वर्ण प्रसादम असं या मिठाईचं नाव आहे. ही मिठाई तयार करताना 24 कॅरट सोनं, केसर, चिलगोजा आणि इतर महागाड्या साहित्याचा वापर केला जातो, त्यामुळे या मिठाईची किंमत देखील प्रचंड महाग आहे. या मिठाईमध्ये अनेक महागड्या ड्राय फ्रुट्सचा देखील वापर केला जातो. या मिठाईची किंमत तब्बल 1 लाख 11 हजार रुपये प्रति किलो एवढी आहे. या मिठाईच्या प्रति पिसची किंमत तीन हजार रुपये एवढी आहे. एक किलो मिठाई तर खूप दूरची गोष्ट आहे, मात्र तुम्हाला जर या मिठाईचे दोन पिस जरी खरेदी करायचे असतील तरी त्यासाठी तुम्हाला सहा ते सात हजार रुपये मोजावे लागतात.

एवढी महाग का?

स्वर्ण प्रसादम या मिठाईचं प्रमुख वैशिष्ट म्हणजे ही मिठाई तयार करताना शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. एवढंच नाही तर या मिठाईमध्ये केशर, चिलगोजा यांच्यासह महाग ड्राय फ्रुटसचा वापर केला जातो. ही मिठाई तयार करताना विशेष काळजी घेतली जाते, त्यामुळे या मिठाईची किंमत देखील तेवढीच महाग असते. या मिठाईची पॅकिंग ही साध्या मिठाईच्या डब्यामध्ये केली जात नाही तर त्यासाठी खास ज्वलरी बॉक्स देखील बनवून घेतले जातात.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language