
प्रज्ञान ओझा भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबत खेळले आहेत. ते आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सकडून रोहितसोबतही खेळले होते. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, प्रज्ञान यांचे सध्याच्या वरिष्ठ खेळाडूंशी चांगले संबंध आहेत आणि बीसीसीआयने हे सुनिश्चित केले की या चांगल्या संबंधांचा उपयोग एका चांगल्या कार्यासाठी केला जाईल.
संघात वरिष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षक कमिटीमध्ये वाद असल्याचे अनेक वाद समोर आले आहेत. संघातील हे वातावरण कमी करुन ते मैत्रीत रुपांतर करण्याचे काम हे प्रज्ञान ओझांकडे सोपवण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.
आता, मुख्य निवडकर्ता बनल्यानंतर प्रज्ञान ओझा यांच्यासमोर एक मोठे आव्हान आहे. २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक एका वर्षापेक्षा कमी कालावधीवर आला आहे. विशेषतः गोलंदाजीच्या खराब कामगिरीवर तोडगा काढणे, ही पुढील वर्षभरात निवड समितीसाठी सर्वात मोठी डोकेदुखी असेल. भारतीय संघाच्या गोलंदाजी विभागात एकदिवसीय सामन्यांच्या अनुभवाची तीव्र कमतरता आहे.
यापूर्वी अजित आगरकर यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. आगरकरांचा हा कार्यकाळ खूप चर्चेचा विषय बनला होता. आगकरांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले होते. अनेक खेळाडूंनी त्यांच्या कार्यकाळात निवृत्ती ही घेतली. अनेक नवीन खेळाडूंना संघात संधी मिळाली. आता प्रज्ञान ओझा यांच्या कार्यकाळात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Source: TV9 Marathi Sports
