न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी ऋतुराज गायकवाडने आपला उत्कृष्ट फॉर्म दाखवला. या उजव्या हाताच्या फलंदाजाने रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी एक शानदार शतक झळकावले.
ऋतुराज गायकवाडने १६९ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले, जे प्रथम-श्रेणी क्रिकेटमधील त्याचे १० वे शतक आहे. गायकवाडने आपल्या खेळीत १०३ निर्धाव चेंडू खेळले आणि १०१ धावांवर नाबाद राहिला.
ऋतुराज गायकवाडच्या खेळीमुळे महाराष्ट्राने पहिल्या डावात ५२७ धावांचा डोंगर उभा केला. त्याने आणि अंकित बावणे यांनी ३२९ चेंडूंमध्ये १८२ धावांची भागीदारी केली.
अंकित बावणेने महाराष्ट्रासाठी सर्वाधिक १६९ धावा केल्या. दिग्विजय पाटीलनेही १४८ धावांचे योगदान दिले. झारखंडचा संघ पहिल्या डावात केवळ १६९ धावांवर सर्वबाद झाला.
ऋतुराज गायकवाडच्या शतकापेक्षा त्याने सातव्या क्रमांकावर येऊन एवढी मोठी खेळी खेळली असल्याने त्याची जास्त चर्चा होत आहे.
Source: TV9 Marathi Sports





