Hashtagintro

IND vs NZ : श्रीलंकेत वादळ आणलं, 16 विकेट काढले, तरी न्यूझीलंडसाठी त्याचा साधा विचार नाही, अखेर निवड समितीला काय हवं?

IND vs NZ : श्रीलंकेत वादळ आणलं, 16 विकेट काढले, तरी न्यूझीलंडसाठी त्याचा साधा विचार नाही, अखेर निवड समितीला काय हवं?

IND vs NZ Test Series : न्यूझीलंड विरुद्ध 19 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीममध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. पण या टीममध्ये एक नाव नाहीय. त्याची सगळीकडे चर्चा आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुथार. श्रीलंका दौऱ्यावर 16 विकेट काढून मानव सुथारने आपल्या गोलंदाजीने सर्वाना प्रभावित केलं होतं. एका स्पिनरने परदेश दौऱ्यावर सातत्याने विकेट काढणं हे कौशल्य, नियंत्रण आणि परिस्थिती नुसार गोलंदाजी करण्याचे संकेत आहेत. अशा कामगिरीनंतर न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीममध्ये स्थान मिळत नसेल, तर निवडकर्त्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं.

सुथार डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. फक्त टर्न हे त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य नाहीय. दिशा-टप्प्यावर नियंत्रण ठेऊन फलंदाजांना चूका करायला भाग पाडणं ही सुद्धा त्याची खासियत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये अशा गोलंदाजांचं महत्व वाढतं. कारण फलंदाजांना आऊट करण्यासाठी धैर्य, शिस्त आणि सतत दबाव टाकण्याची गरज असते.

अशावेळी फिरकी गोलंदाज एक पर्याय

न्यूझीलंडमध्ये वेगवान गोलंदाजांना स्विंग आणि सीम मूवमेंटसाठी मदत मिळण्याची अपेक्षा असते. न्यूझीलंडमध्ये पीचची स्थिती आणि परिस्थितीच्या हिशोबाने स्पिनर्सची भूमिका बदलू शकते. अशावेळी फिरकी गोलंदाज एक पर्याय ठरु शकतो.

तीन कसोटी सामन्यात 23 विकेट

मानव सुथारचे करिअरमधील आकडे त्याची क्षमता दाखवून देतात. त्याने आतापर्यंत तीन कसोटी सामन्यात 23 विकेट घेतलेत. त्यांच्या गोलंदाजीची सरासरी 17.34 आणि इकॉनमी रेट 2.84 आहे. त्याने दोनवेळा पाचविकेट घेण्याचा कारनामा केला आहे. एकाच सामन्यात त्याने 10 विकेट सुद्धा घेतले आहेत.

दुर्लक्ष हा चर्चेचा विषय जरुर

हे आकडे कुठल्याही गोलंदाजासाठी प्रभावशाली आहेत. परदेशात प्रदर्शन करताना विरोधी टीम, पीच आणि मॅचची स्थिती लक्षात घेणं गरजेचं असतं. मात्र, तरीही श्रीलंकेत 16 विकेट्सकडे दुर्लक्ष हा चर्चेचा विषय जरुर आहे.

तीन पर्याय

न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर सारखे पर्याय उपलब्ध आहेत. जाडेजा आपला अनुभव आणि ऑलराऊंडर क्षमतेसाठी ओळखला जातो. कुलदीप मनगटी स्पिनर आहेत. सुंदर ऑफ स्पिन गोलंदाजीसह फलंदाजीतही योगदान देतो.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language