
रॅपर एमसी स्टॅन नुकताच समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लीजेंड सीझन २’ या शोमध्ये दिसला. त्याचा झालेला कायापालट पाहून सर्वजण थक्क झाले. एमसी स्टॅनने आपल्या या बदलावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, तो इस्लामच्या मार्गाचं अनुसरण करत असून त्यानं सर्व वाईट सवयी सोडल्या आहेत. दरम्यान, स्टेजवर सिगारेट ओढतानाचे त्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल झाले.
बिग बॉस १६ चा विजेता एमसी स्टॅन समय रैनाच्या शोच्या आठव्या एपिसोडमध्ये सहभागी झाला होता, जिथे तन्मय भट्ट, अर्पित बाला आणि मधुर विर्ली यांसारखे पाहुणे परीक्षक म्हणून त्याच्यासोबत होते. एमसी स्टॅन अशा शोमध्ये क्वचितच दिसतो. आता, बिग बॉस नंतर, तो अशा शोमध्ये दिसल्यानं त्याचे चाहते खूप उत्साहित झाले होते.
याच शोमध्ये एमसी स्टॅननं आपली आध्यात्मिक बाजू देखील उघड केली. समय रैना शोमध्ये म्हणाला की, गेल्या तीन वर्षांत एमसी स्टॅनमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. त्याच्या जीवनशैलीपासून ते आवाजाच्या सुरापर्यंत, सर्व काही बदललं आहे.
MC Stan literally lit a ciggi at India’s Got Latent
https://t.co/eXuSfitHnT
— revengeseeker (@revengeseekerr) October 25, 2026
एमसी स्टॅन अध्यात्माच्या मार्गावर
समय रैनाने एमसी स्टॅनला विचारलं की, ‘तीन वर्षांत तू खूप बदलला आहेस. तू आता ड्रग्स घेत नाहीस. तू घाणेरडं बोलत नाहीस. तू अध्यात्माच्या मार्गावर चालायला सुरुवात केली आहेस का?’ एमसी स्टॅननं सांगितलं की, त्याच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलले आहेत. त्याला आता श्रद्धेच्या मार्गावर चालायचं आहे. एमसी स्टॅन म्हणाला, ‘मी आता अध्यात्माच्या मार्गावर चालत आहे. त्याला जे आवडतं ते मी करत आहे. पूर्वी, मला जे आवडायचं ते मी करायचो. मी माझ्या आवडी आणि स्वप्ने पूर्ण केली. पण आता मी ईश्वरी मार्गावर चालत आहे.’ एका क्लिपमध्ये, एमसी स्टॅन सिगारेट काढून ती पेटवण्याच्या तयारीत दिसतो. पण समय रैनाला एमसी स्टॅन काय करत आहे, हे लगेच दिसतं आणि तो त्याला थांबवतो. एमसी स्टॅनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Source: TV9 Marathi Entertainment


https://t.co/eXuSfitHnT