Hashtagintro

Makarand Anaspure : …अन् ते बोलणं ठरलं शेवटचं! मकरंद अनासपुरे यांनी सांगितली नाना पाटेकरांची आठवण, म्हणाले…

Makarand Anaspure : …अन् ते बोलणं ठरलं शेवटचं! मकरंद अनासपुरे यांनी सांगितली नाना पाटेकरांची आठवण, म्हणाले…

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानं संपूर्ण मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. नानांच्या अचानक जाण्यानं त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. त्यांचे जवळचे मित्र आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नानांसोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी नानांची अपूर्ण राहिलेली इच्छा सांगितली असून, नानांच्या आठवणीच ते भावुक झाले आहेत. नाना पाटेकर यांच्या निधनानं मकरंद अनासपुरे यांनी केवळ एक मित्र गमावलेला नाही, तर आपला मार्गदर्शक आणि कठीण प्रसंगी खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा माणूसही गमावला आहे.

काय म्हणाले मकरंद अनासपुरे?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मकरंद अनासपुरे म्हणाले की, त्यांना ज्यावेळी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल समजलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला होता. एक–दोन दिवस मला काही समजत नव्हतं, आता हळू–हळू स्वतःला सावरत आहे, असं मकरंद यांनी सांगितलं. नाना पाटेकर यांच्यासोबतच्या शेवटच्या संवादाबद्दल सांगताना मकरंद अनापसुरे म्हणाले की, ‘ते गोव्याला जाण्याआधी आमचं बोलणं झालं होतं. मी त्यांना म्हणालो की, यंदा आपल्याला खूप काम करावं लागेल. ते मला म्हणाले, मी गोव्यावरून आल्यावर आपण या विषयावर बसून बोलू.’

‘त्यांची अशी इच्छा होती की, आपण सगळीकडे हिंडावं. चिपळूणमध्ये जेव्हा पूर आला, त्यावेळी आम्ही ‘नाम’च्या वतीनं काय मदत करावी यासाठी मीटिंग घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, तुम्ही पूर आल्यानंतर मदत पाठवताय. पण पूर येऊ नये असं काम का करत नाही तुम्ही? नानांचा असा विचार होता की, समस्याच येऊ नये यासाठी प्रयत्न करा. एनडीआरएफचे जवान सर्व आपत्तीच्या ठिकाणी कामं करतात. नानांनी विचारलं, त्यांची घरं कुठे आहेत. त्यांच्या या विचारानं आम्ही या जवानांसाठी पाच गाड्या तयार केल्या, ज्यामध्ये ५० जणांचं जेवण करता येईल, आराम करता येईल. कुठे आपत्ती आली, तर ती गाडीच घेऊन जाता येईल. नानांचे विचार वेगळे होते. आता हे विचार आम्हाला कोण सांगेल? आता गुरुजींनी हे सुचवावं, असं मी त्यांना सांगेन’ असं मकरंद अनासपुरे यांनी शेवटी सांगितलं. ‘न्यूज18 मराठी‘ला दिलेल्या मुलाखतीत मकरंद अनासपुरे बोलत होते.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language