
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.या घटनेनंतर ‘ऑल स्टार्स फुटबॉल क्लबने’ (ASFC) ने रविवारी होणारी आपला फुटबॉल सराव सत्र पुढील आदेश येईपर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. या क्लबमध्ये रणबीर कपूर कार्तिक आर्यन आणि अभिषेक बच्चन यांसारखे कलाकारही फुटबॉल खेळण्यासाठी सहभागी होतात.
25 ऑक्टोबरचा सामना रद्द
मुंबईतील जुहू परिसरात असलेला जमुनाबाई नरसी स्कूलच्या मैदानावर ऑल स्टार्स फुटबॉल क्लबचे सदस्य दर रविवारी फुटबॉल खेळण्यासाठी एकत्र येतात. मात्र 18 ऑक्टोबरला टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबारानंतर सुरक्षेच्या कारणास्तव 25 ऑक्टोबरचं सराव सत्र रद्द करण्यात आलं. क्लबचे मालक बंटी वालिया यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व प्रशिक्षणं सत्र थांबवली असल्याचं सांगितलं.
पोलिसांशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय
‘मिड डे’ ला दिलेल्या माहितीमध्ये बंटी वालिया यांनी सांगितलं की सराव सत्र पुन्हा सूरू करण्यापूर्वी पोलिसांशी चर्चा करणं आवश्यक आहे. कलाकारांच्या सुरक्षेसाठी योग्य व्यवस्था केल्यानंतरच पुढील सामन्यांबाबत निर्णय घेतला जाईल. असं बंटी वालिया यांनी सांगितलं.
टायगर श्रॉफच्या कारवर नेमकं काय घडलं?
18 ऑक्टोबरला संध्याकाळी टायगर श्रॉफ जुहूमधील फुटबॉल मैदानावरून निघत असताना त्याच्या कारवर गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी कारच्या दिशेने गोळ्या झाडल्या, या घटनेत टायगर सुरक्षित राहिला. मात्र त्याचा चालक आणि गाडीभोवती असलेला एक फॅन जखमी झाला. या प्रकरणात पोलिंसाकडून चौकशी सुरू आहे.
Source: TV9 Marathi Entertainment
