सैफ अली खानने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’ चित्रपटात पहिल्यांदा पोलिसाची वर्दी परिधान केली होती. मात्र, या चित्रपटात तो प्रत्यक्षात पोलिसाची भूमिका साकारत नव्हता. तो एका चित्रपट अभिनेत्याच्या भूमिकेत होता.
एका मुलाखतीत सैफने या चित्रपटातील अनुभव सांगितला. त्याने सांगितले की, चित्रपटात त्याला पोलिसाची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमारकडून प्रशिक्षण घ्यावे लागले होते. अक्षयने या चित्रपटात इन्स्पेक्टर करण जोगळेकरची भूमिका साकारली होती.
या चित्रपटाची कथा हॉलीवूडच्या ‘द हार्ड वे’ या चित्रपटावर आधारित होती. 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात मायकेल जे. फॉक्स आणि जेम्स वुड्स यांनी काम केले होते. हा एक बडी-कॉप कॉमेडी चित्रपट होता.
मैं खिलाड़ी तू अनाड़ी’ चित्रपटातील शीर्षकगीत अनु मलिक यांनी संगीतबद्ध केले होते. अभिजीत आणि उदित नारायण यांनी हे गाणे गायले होते. या गाण्यात ‘व्हॅम बॅम’ या ट्रॅकच्या बेसलाइनचा वापर करण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे हे गाणं त्याच्या मुखड्यावरून सुरु होत नाही. हे गाणं 'लडकी देखी मुह से सीटी बजे हातसे ताली' असं सरु होतं
चित्रपटात शिल्पा शेट्टीने मोना आणि बसंती अशा दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. तर रागेश्वरी शिवानीच्या भूमिकेत दिसली होती. सैफने सांगितलेला हा जुना किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे.
Source: TV9 Marathi Entertainment





