सचिन तेंडुलकर यांनी एक पोस्ट केली आहे त्याची आता चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर एक त्यांनी त्यांच्या पुतणीसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
सचिन तेंडुलकर म्हणाले की, 'माझी पुतणी करिश्माचं मन:पूर्वक अभिनंदन, तुझ्या मेहनतीची दखल घेतली गेली, हे पाहून खूप छान वाटतंय', तुला हे माहिती असू दे की तुझे हे यश, आणि तुझी ही कामगिरीबद्दल मी सगळ्यांना सांगत सुटणार आहे, मला तुझा खूप अभिमान आहे'.
सचिनची पुतणी करिश्माला महाराष्ट्र नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेच्या 2026 च्या वार्षित परिषदेत, तरुण नेत्ररोगतज्ज्ञाने सादर केलेला सर्वोत्तम शस्त्रक्रिया संशोधन निबंधासाठीचा बेल फार्मा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबईमध्ये झालेल्या या परिषदेमध्ये डॉ. फारुख उदवाडिया यांच्याहस्ते डॉ. करिश्मा तेंडुलकरला हा पुरस्कार देण्यात आला. करिश्माने तिच्या या यशाचं श्रेय नारायणा नेत्रालयातील मार्गदर्शकांना दिले आहे, तसंच भविष्यात रुग्णांना सर्वोत्तम उपचार देण्यासाठी मी अधिक मेहनत करेन, असा निर्धारही करिश्माने व्यक्त केला.
करिश्मा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकरचा मोठा भाऊ नितीन तेंडुलकर आणि मीना तेंडुलकर यांची मुलगी असून ती मेडिकलची विद्यार्थींनी आहे. ती एक नेत्ररोगतज्ज्ञ आहे.
Source: TV9 Marathi Sports





