Hashtagintro

अरेरे! फक्त एक धावामुळे मैदानात राडा, टीमची थेट बीसीसीआयकडे तक्रार, घडलं तरी काय?

अरेरे! फक्त एक धावामुळे मैदानात राडा, टीमची थेट बीसीसीआयकडे तक्रार, घडलं तरी काय?

भारतीय क्रिकेटमध्ये एक अनोखा वाद निर्माण झाला आहे. फक्त एका धावेसाठी खेळाडूंनी थेट बीसीसीायकडे धाव घेतली आहे. हे प्रकरण १९ वर्षांखालील स्पर्धेशी संबंधित आहे, जिथे एका धावेमुळे वाद निर्माण झाला आहे. मंगळवारी नागपूरमध्ये झारखंड आणि उत्तराखंडच्या १९ वर्षांखालील महिला संघांमध्ये एक सामना खेळला गेला. झारखंड क्रिकेट असोसिएशनचा (जेसीए) दावा आहे की, धावफलक नोंदवण्यातील चुकीमुळे त्यांच्या संघाचा पराभव झाला आणि ते स्पर्धेतून बाहेर पडले.

झारखंड क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयकडे तक्रारही दाखल केली आहे. प्रथम फलंदाजी करताना उत्तराखंडने १३४ धावा केल्या, तर झारखंडचा संघ १३३ धावांवर सर्वबाद झाला. अधिकृत धावफलकानुसार, झारखंड केवळ एका धावेने हरला. या एका धावेच्या पराभवामुळे झारखंड स्पर्धेतून बाहेर पडला.

धावबाद, पण एक धाव जोडली नाही

‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, जेसीएने आपल्या तक्रारीत दावा केला आहे की, सामना प्रत्यक्षात बरोबरीत सुटला होता, परंतु अधिकृत धावफलकाच्या चुकीमुळे निकाल बदलला. तक्रारीत म्हटले आहे की, ३० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दुसरी धाव घेण्यासाठी धावत असताना त्यांचा एक खेळाडू धावबाद झाला. झारखंडचा युक्तिवाद आहे की अधिकृत धावफलकावर धावबादची नोंद केली, परंतु फलंदाजाने केलेली एक धाव नोंदवली नाही.

मैदानावरील धावफलकानुसार, झारखंडला शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती, परंतु त्यांच्या फलंदाजांना फक्त एकच धाव करता आली. त्यांना वाटले की सामना बरोबरीत सुटला आहे, परंतु जेव्हा त्यांना एका धावेने पराभूत घोषित करण्यात आले तेव्हा झारखंड संघाला धक्का बसला. झारखंड संघाच्या काही सदस्यांनी अधिकृत धावफलकाशी थोडा वाद घातला, परंतु निकालात कोणताही बदल झाला नाही.

त्याच अहवालानुसार, जेसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, २९.४ व्या षटकादरम्यान, झारखंडचा एक फलंदाज दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना बाद झाला, परंतु पहिली धाव आधीच पूर्ण झाली होती. अधिकाऱ्याने सांगितले की ती एक धाव धावफलकावर नोंदवली गेली नाही.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language