Hashtagintro

मोठी खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप, कपडे फाडले अन्…मिस स्वित्झर्लंडचा धक्कादायक दावा!

मोठी खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप, कपडे फाडले अन्…मिस स्वित्झर्लंडचा धक्कादायक दावा!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आता खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांनी सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्वित्झर्लंडची माजी सौंदर्यवती बीट्रिस क्यूल हिने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 1993 मध्ये बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या गंभीर दाव्याचा उल्लेख अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेतील डेमोक्रॅटिक सदस्यांच्या नव्या अहवालात करण्यात आला आहे. बीट्रिस यांच्या दाव्यानुसार, न्यूयॉर्कमधील प्लाझा हॉटेलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांची ट्रम्प यांच्याशी भेट झाली होती. ट्रम्प यांनी अमेरिकेचा व्हिसा मिळवून देण्यास आणि न्यूयॉर्क विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते, असा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, नोव्हेंबर 1993 मध्ये बीट्रिस क्यूल 24 वर्षांच्या होत्या. त्या मॉडेलिंगसोबत फायनान्स क्षेत्रातही काम करत होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिकन ड्रीम पेजंट’ या सौंदर्यस्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 16 ते 22 वर्षीय तरुणी मॉडेल सहभागी होत असतं. यावेळी न्यूयॉर्क प्लाझातील हॉटेलमध्ये प्रेस लंचचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथंच आपली डोनाल्ड यांच्या भेट झाली होती, असा दावा त्यांनी केला आहे. त्यावेळी ते हॉटेल हे ट्रम्प यांच्याच मालकीचं होतं. याच हॉटेलमध्ये आपल्याबरोबर बलात्कार केला गेला असल्याचं बीट्रिस यांनी या अहवालात म्हटलं आहे.

अहवालात नेमंक काय?

अहवालानुसार, ट्रम्प यांच्या हॉटेलातील एका प्रतिनिधीने त्यांना हॉटेलमधील एका खोलीत नेले. आपल्याला व्हिसा आणि विद्यापीठामध्ये प्रवेश मिळेल या अपेक्षेने आपण तिथे गेलो. पण तिथेच ट्रम्प यांनी आपल्याला मागून पकडून बलात्कार केल्याचा आरोप बीट्रिस यांनी केला. या घटनेत आपले कपडे फाटले, शरीरावर अनेक जखमा झाल्या आणि रक्तस्राव झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यानंतर आपल्याला गप्प राहण्यास सांगितल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

व्हाइट हाऊसने आरोप फेटाळले

या आरोपांवर व्हाइट हाऊसने प्रतिक्रिया देताना ते फेटाळले आहेत. डेमोक्रॅटिक सदस्यांचा अहवाल हा ट्रम्प यांना लक्ष्य करण्यासाठी केलेला राजकीय प्रयत्न असल्याचे व्हाइट हाऊसने म्हटले आहे. या आरोपांप्रकरणी ट्रम्प यांच्यावर गुन्हेगारी आरोप निश्चित झाल्याची माहिती नाही.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language