Hashtagintro

Kasautii Zindagi Kay: ‘कसौटी जिंदगी की’ मधील अनुराग बासू जगतोय असं आयुष्य, ‘ते’ फोटो पाहून म्हणाल…

Kasautii Zindagi Kay: ‘कसौटी जिंदगी की’ मधील अनुराग बासू जगतोय असं आयुष्य, ‘ते’ फोटो पाहून म्हणाल…

टीव्ही विश्वातील लोकप्रिय मालिका ‘कसौटी जिंदकी की’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. एक काळ होता, जेव्हा मालिकेने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मालिकेत अभिनेत्री श्वेता तिवारी हिने महत्त्वाची भूमिका साकारली. तर अभिनेता सिजेन खान मुख्य भूमिकेत दिसला. सिजेन याने अनुराग बासू या भूमिकेला न्याय दिलेला. पण ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेत दमदार भूमिका साकारल्यानंतर सिजेन पुन्हा छोट्या पडद्यावर दिसलाच नाही. तर जाणून घ्या सिजेन आता कायम करतो आणि असं आयुष्य जगत आहे.

अनुराग बासू या भूमिकेमुळे मिळाली प्रसिद्धी..

सिजेन खान ‘कसौटी जिंदगी की‘ मालिकेतून घराघरात पोहोचला आहे. आज देखील त्याच्या खऱ्या नावाने कोणी ओळखत नाही. प्रत्येक जण सिजेन याला अनुराग बासू म्हणूनच ओळखतो… लव्ह स्टोरीवर आधारित मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. अनेक तरुण सिजेन याची लाईस्टाईल फॉलो करायचे… कारण अभिनेता मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांना फॅशन गोल्स द्यायचा.

चांगले ऑफर्स मिळाले नाहीत…

‘कसौटी जिंदकी की’ मालिकेनंतर अभिनेता कोणत्या मालिकेत झळकलाच नाही. एका मुलाखतीत सिजेन म्हणालेला, ‘कसौटी जिंदकी की’ मालिका संपल्यानंतर त्याच्या जवळ अनेक ऑफर्स होत्या. पण त्या ऑफर्स अभिनेत्याला आवडल्या नाहीत. त्या काळात अभिनेता काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात होता. पण त्यानंतर अभिनेत्याला कोणत्या ऑफर्स आल्याच नाहीत.

अखेर अभिनेत्याने आयुष्य वेगळ्या मार्गाने जगण्याचा निर्णय घेतला. यावर अभिनेता म्हणालेला, मी अभिनयाकडे करिअर म्हणून पाहणं थांबवलं होतं. त्याऐवजी, मी गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केलं. मी माझं आयुष्य जगायला सुरुवात केलं. मी फिरायला लागलो आणि जीवनाचा आनंद घेऊ लागलो. मी प्रत्येक दिवसाचा मनमुराद आनंद घेतला.

सिजेन खान याने जवळपास 12 वर्षांच्या ब्रेकनंतर ‘शक्ती अस्तित्व के एहसास की’ या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पुनरागमन केलं होतं. यानंतर, 2022 मध्ये अभिनेता ‘अपनापन बदलते रिश्तों का बंधन’ या टीव्ही मालिकेत झळकलेला. या रोमँटिक मालिकेत सिजेन याचा अभिनय अप्रतिम होता, मात्र प्रेक्षकांमध्ये ही मालिका फारशी लोकप्रिय ठरली नाही.

आता अभिनेता काय करतोय?

सध्या सिजेन खान कोणत्याही मालिकेत किंवा टीव्ही शोमध्ये दिसत नाहीत, पण याचा अर्थ त्याने अभिनयातून संन्यास घेतला आहे, असा होत नाही. एखादा चांगला प्रोजेक्ट मिळाल्यास तो पुन्हा पुनरागमन करू शकतात. सध्या अभिनेता त्याच्या खासगी आयुष्याचा आनंद घेत आहेत.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language