Hashtagintro

Kavya Maran Wedding: रजनीकांत यांच्या सूनेचा थाट! सनराइजर्स हैदराबादच्या मालकीणीच्या लग्नाची पत्रिकाच व्हायरल, तुम्ही पाहिलीत का?

Kavya Maran Wedding: रजनीकांत यांच्या सूनेचा थाट! सनराइजर्स हैदराबादच्या मालकीणीच्या लग्नाची पत्रिकाच व्हायरल, तुम्ही पाहिलीत का?

तामिळ सिनेमात आपल्या संगीताने खळबळ माजवणारे संगीतकार आणि गायक अनिरुद्ध रविचंदर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. अनिरुद्ध रविचंदर सनराइजर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन यांच्याशी विवाह करणार आहेत. अलीकडील मीडिया रिपोर्ट्सनुसार अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन ११ नोव्हेंबरला ग्रीसमध्ये लग्न करणार आहेत आणि जोडपे २१ नोव्हेंबरला चेन्नईत भव्य रिसेप्शन आयोजित करणार आहे. त्यांच्या रिसेप्शनला अनेक VVIP पाहुणे हजेरी लावणार आहेत. आता रजनीकांत यांची होणारी सून काव्याने लग्नासाठी रॉयल अशी पत्रिका छापली आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांच्या एक्स हॅण्डलवर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे काव्याच्या पालकांसोबतचे फोटो शेअर करण्यात आले होते. काव्या मारनच्या पालकांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या मुलीच्या रिसेप्शनला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिले. जोडप्याच्या पालकांनी चेन्नईत होणाऱ्या भव्य रिसेप्शनसाठी तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांची भेट घेतली आणि त्यांनाही आमंत्रित केले.

काव्या आणि अनिरुद्ध यांच्या रिसेप्शन कार्डची चर्चा

काव्या मारनचे वडील कलानिधी मारन यांनी अनिरुद्ध रविचंदरच्या पालकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांनाही आपल्या मुलांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले. याशिवाय त्यांनी नवी दिल्लीत सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. यावेळी काँग्रेसची सचिव प्रियंका गांधीही उपस्थित होत्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींनाही समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

लग्नाची रॉयल पत्रिका

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर यांच्या लग्नाची रॉयल पत्रिका सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हे कार्ड ‘पिंक व्हिसल मॅन’च्या रजनी अय्यंगार यांनी डिझाइन केले आहे. हे शाही कार्ड ज्यूअलरी बॉक्ससारखे बनवण्यात आले आहे. त्याची रंगसंगतीही खूप रॉयल आहे. पांढऱ्या रंगाच्या बॉक्सवर रॉयल ब्लू प्लास्टर ऑफ पॅरिसची नक्षीकाम केलेली आहे.

‘पिंक व्हिसल मॅन’ने इंस्टाग्रामवरील आपल्या अधिकृत पेजवरून कार्डची झलक शेअर केली आहे. हे कार्ड पाहून अनिरुद्ध आणि काव्या मारन यांच्या शाही लग्नाचा अंदाज बांधता येतो. जोडपे ग्रीसमध्ये फक्त जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न बंधनात अडकणार आहेत. तर चेन्नईत काव्या आणि अनिरुद्ध VVIP पाहुण्यांसाठी भव्य रिसेप्शन आयोजित करणार आहेत, ज्यासाठी हे कार्ड आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language