Hashtagintro

Manoj Jarange Patil : चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार… मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्याकडे केवळ चारच ऑडिओ क्लिप नसून, आणखी बऱ्याच ऑडिओ क्लिप्स असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही दिवसांतच आपण हे आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजातील लोकांना पैशांच्या जोरावर फोडण्याचे षडयंत्र थांबवावे, असे थेट आवाहन त्यांनी सत्ताधाऱ्यांना केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे षडयंत्र बंद न केल्यास, काही महिन्यांनंतर आणखी मोठे बॉम्ब टाकणार असल्याचे जरांगे पाटलांनी नमूद केले. ते म्हणाले, “माझ्याकडे चार ऑडिओ क्लिप नाहीत, खूप आहेत. ती ऐकण्याची ताकद आहे का?” मराठ्यांच्या लोकांचे प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला. २०२९ मध्ये काही लोकांची जिरवण्याची इच्छा असून, त्याची गरज काय, हे मराठा समाजच ठरवेल, असे सूचक विधानही त्यांनी केले. या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language