Hashtagintro

Maharashtra Weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सावट; कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरींची शक्यता

Maharashtra Weather: नोव्हेंबर महिना सुरू झाला असला तरी राज्यातील हवामानात अद्याप स्थिरता आलेली नाही. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर काही भागांत उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. 4 नोव्हेंबर रोजी कोकणापासून विदर्भापर्यंत हवामान कसे असेल, याबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
https://www.prahaar.in/2026/11/04/relief-from-the-centre-for-fishermen-affected-by-natural-disasters-increased-aid-to-be-provided-for-damage-to-boats-and-nets/
कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता
कोकणातील काही भागांत मागील 2 ते 3 दिवसांपासून हलक्या पावसाच्या सरी पडत आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तर कोकणातील उर्वरित जिल्ह्यांसाठी पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. पुढील काही दिवसांत हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात उष्ण आणि दमट हवामान
धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागांत उष्ण आणि दमट हवामान कायम राहू शकते. पुढील 4 ते 5 दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज
पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे. 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यांत पावसाचा इशारा नसल्याचे सांगण्यात आले आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जनेची शक्यता आहे. दुसरीकडे बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

विदर्भात उष्ण आणि कोरडे हवामान
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या विभागासाठी पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. कमाल तापमान 31 ते 32 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. पुढील 4 ते 5 दिवस उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे.

5 नोव्हेंबरनंतर पावसाचा जोर कमी होणार?
एकूणच, 4 नोव्हेंबर रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कोरडे हवामान राहू शकते. 5 नोव्हेंबरनंतर राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी होऊन पुन्हा कोरडे हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका जाणवू शकतो.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language