Hashtagintro

BMC : महापालिका मुख्यालयासह फोर्ट हेरिटेज परिसरातील पदपथांची होणार सुधारणा

मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महापालिकेच्या फोर्ट हेरिटेज परिसराचा कायापालट आता वेगळ्या पध्दतीने केला जाणार असून त्याअंतर्गत आता येथील रस्त्यांच्या पदपथांची सुधारणा करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. येथील पदपथांवर हेरिटेज परिसराची ओळख कायम ठेवण्यासाठी येथील पदपथांवर काळे चौकोनी दगडांचा वापर केला जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने फोर्ट परिसरातील ऐतिहासिक इमारतींची दृश्यमानता सुधारणे, पादचारीकरण आणि नागरी रचनाविषयक सुधारणा करण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेने पाऊल टाकले आहे. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून ते महात्मा ज्योतिबा फुले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केट जंक्शनपर्यंत डी.एन. रोडलगतच्या पदपथाची सुधारणा करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १३ कोटी रुपये आणि पुढील तीन वर्षांची देखभाल याकरता ६५ लाख रुपये अशाप्रकारे अंदाजित खर्चानुसार निविदा निमंत्रित करण्यात आली आहे. यासाठी निविदा जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मेट्रो रेल्वेच्या कामामुळे येथील पदपथांची सुधारणा करता येत नव्हती, आता हे काम पूर्ण झाल्यामुळे पदपथांवर काळे दगड बसवून सुधारणा करण्यात येणार आहे. डि.एन.रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर एम.जी रोडच्या पदपथांची सुधारणा करण्यात येणार आहे,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language