Hashtagintro

Amitabh Bachchan on health: अमिताभ बच्चन यांची तब्येतीबाबत पोस्ट, हाताला त्रास असल्याने चाहत्यांची मागितली माफी

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीबाबत गेल्या काही दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात होती. त्यांनी आपल्या लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती १८’ च्या शूटिंगला दांडी मारल्याने चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण होते. आता स्वतः बच्चन यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. लिहिणाऱ्या हाताला त्रास होत असल्यामुळे चाहत्यांना उत्तर देण्यास उशीर होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
बच्चन यांनी आपल्या ताज्या ब्लॉगमध्ये चाहत्यांनी पाठवलेल्या शुभेच्छा आणि भेटवस्तूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. अनेक शुभचिंतकांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात शुभेच्छा आणि भेटवस्तू येत आहेत की त्या ठेवायला आता जागा उरलेली नाही, असे त्यांनी लिहिले आहे. या भेटवस्तू व्यवस्थित ठेवल्या नाहीत तर तो त्यांचा अनादर ठरेल, असेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे प्रेमापोटी भेटवस्तू पाठवणाऱ्या सर्वांचे आभार मानत त्यांनी प्रत्येकाला वैयक्तिकरित्या पत्र लिहून उत्तर देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
https://www.prahaar.in/2026/11/08/katrina-and-vicky-give-fans-a-diwali-gift-they-shared-a-photo-of-their-son-vihaan-on-social-media/
मात्र हाताच्या त्रासामुळे हे काम लांबणीवर पडत आहे. “मला ही उत्तरे स्वतःच्या हाताने लिहायची होती. पण ज्या हाताने मी लिहितो, त्या हातात काही त्रास होत आहे. त्यामुळे उत्तर देण्यास उशीर होत आहे. त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो,” असे बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे. आपल्याला वारंवार माफी मागावी लागत असल्याबद्दलही त्यांनी यावेळी भाष्य केले. परिस्थिती अशी बनली आहे की माफी मागणे सोपे वाटते, असे ते म्हणाले. माफी मागण्यात काहीही गैर नाही. समोरची व्यक्ती ती नाकारू शकते, स्वीकारू शकते किंवा समजून घेऊ शकते. जर तिने समजून घेऊन माफी स्वीकारली, तर मनाला आनंद होतो. पण जर तिने स्वीकारली नाही, तर तिचे मन अस्वस्थ राहते, असे विचार त्यांनी मांडले.
आनंद की राग, यापैकी काय निवडायचे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आनंदामुळे मनाला शांती आणि समाधान मिळते, तर राग मनात सल ठेवतो. समाधान स्वीकारायचे की सल जपत बसायचे, हे प्रत्येकाने ठरवायचे आहे. काही लोकांना दुःख जपण्यात आनंद मिळतो, तर काहींना समाधानात आनंद मिळतो. आयुष्यातील ही विविधताच जीवनाचे रहस्य आहे, असे म्हणत त्यांनी आपली पोस्ट संपवली. बच्चन यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language