Hashtagintro

Lionel Messi: मेस्सीची कमाल! लिओनेल मेस्सीने रचला इतिहास, सलग दुसऱ्यांदा पटकावला 'गोल्डन बूट' पुरस्कार

मियामी (फ्लोरिडा): आंतरराष्ट्रीय फुटबॉल विश्वात आपल्या नावाचा डंका वाजवणारा लिओनेल मेस्सी याने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. इंटर मियामी सीएफ संघाचा कर्णधार असणाऱ्या मेस्सीने 2026 च्या नियमित हंगामात (Regular Season) शानदार खेळ करत तब्बल 26 गोल नोंदवले. यासह, मेजर लीग सॉकरच्या (MLS) संपूर्ण इतिहासात सलग दोनदा ‘गोल्डन बूट’ पुरस्कार जिंकणारा तो जगातील पहिला आणि एकमेव फुटबॉलपटू ठरला आहे.

या यंदाच्या हंगामात मेस्सीने केवळ गोलच केले नाहीत, तर आपल्या सहकाऱ्यांसाठी १७ असिस्ट्सही दिले. यामुळे त्याचे नियमित हंगामातील गोल आणि असिस्ट्सचे एकूण योगदान 43 वर पोहोचले. गोल्डन बूटच्या या अटीतटीच्या शर्यतीत मेस्सीने एफसी डॅलसचा स्ट्रायकर पीटर मोझेस (22 गोल) आणि नॅशविल एससीचा सॅम सरिज (21 गोल) यांसारख्या तगड्या खेळाडूंना मागे टाकले. तर व्हँकुव्हर व्हाईटकॅप्सचा ब्रायन व्हाईट 20 गोलांसह चौथ्या स्थानावर राहिला.

https://www.prahaar.in/2026/11/08/england-cricket-major-blow-star-pacer-josh-tongue-ruled-out-of-series-against-australia-due-to-injury/
अखेरच्या सामन्यात रोमहर्षक ड्रॉ
शार्लट एफसी विरुद्ध खेळल्या गेलेल्या इंटर मियामीच्या अंतिम नियमित-हंगाम सामन्यात मेस्सीला गोल करता आला नाही आणि हा सामना 3-3 असा चुरशीचा व बरोबरीत सुटला. घरच्या मैदानावर खेळताना मियामीने सुरुवातीला 3-0 अशी भक्कम आघाडी घेतली होती. मात्र, शार्लटने धमाकेदार पुनरागमन करत सामना बरोबरीत सोडवला. जरी हा सामना जिंकता आला नाही, तरी मेस्सीच्या विक्रमी ‘गोल्डन बूट’ विजयावर याचा कोणताही परिणाम झाला नाही.

 

🚨🇺🇸 OFFICIAL: Lionel Messi wins the MLS Golden Boot 2026 and becomes the first player ever to win it back to back.
👟✨ 2025 — 29 goals in 28 games
👟✨ 2026 — 26 goals in 31 games https://t.co/0nNCzSP9lb

— Fabrizio Romano (@FabrizioRomano) November 8, 2026

मेस्सीपूर्वी लीगच्या इतिहासात हा सन्मान दोनदा मिळवणारे मोजकेच खेळाडू झाले आहेत, ज्यामध्ये ब्रॅडली राइट-फिलिप्स, ख्रिस वोंडोलोस्की, जेफ कनिंगहॅम, टेलर ट्वेलमन आणि प्रेकी यांचा समावेश आहे. मात्र, या सर्व दिग्गजांना मागे टाकत सलग दोनदा हा बहुमान मिळवणारा मेस्सी हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी 2025 च्या हंगामातही मेस्सीने 29 गोल आणि 19 असिस्ट्ससह हाच किताब पटकावला होता.

https://www.prahaar.in/2026/11/08/sunil-gavaskar-defends-failed-cricket-experiment-says-nothing-was-wrong-with-tactic/
आता लक्ष ‘एमव्हीपी’ पुरस्कारावर
संपूर्ण हंगामात इंटर मियामीने सर्वाधिक 80 गोल केले, ज्यामध्ये मेस्सीचा वाटा सर्वात मोठा राहिला. आता हा बहुमान पटकावल्यानंतर मेस्सीचे लक्ष एमएलएस मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर (एमव्हीपी) पुरस्कारावर केंद्रित झाले आहे. तो सलग तिसऱ्यांदा हा सन्मान मिळवणारा पहिला फुटबॉलपटू ठरणार का, याकडे संपूर्ण क्रीडासृष्टीचे लक्ष लागले आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language