Hashtagintro

IND vs NZ तिसरा वनडे सामना निकालाविना, भारताकडे दोन संधी; तर न्यूझीलंडला मालिका गमवण्याची भीती

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना हॅमिल्टनच्या सेडन पार्कमध्ये होणार होता. पावसाच्या व्यत्ययामुळे या सामन्यासाठी नाणेफेक सकाळी 9 वाजता झाली. नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण पावसाचा व्यत्यय वारंवार येत असल्याने हा सामना उशिराने सुरू होईल असं सांगितलं गेलं. त्यानंतर हा सामना 20 षटकांचा होऊ शकतो, असं भाकीत वर्तवलं गेलं. पण पाऊस काही थांबला नाही. त्यामुळे हा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे न्यूझीलंडच्या हातून मालिका विजयाची संधी हुकली आहे. तर भारताने सुरूवातीच्या दोन सामन्यात विजय मिळवून 2-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका खिशात घालण्यासाठी भारताला आता उर्वरित दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. तर न्यूझीलंडने उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवला तरी मालिका बरोबरीतच सुटेल.
कर्णधार शुभमन गिल म्हणाला होता की…
नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार शुभमन गिल म्हणाला होता की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. आशा आहे की हवामान थोडे निवळेल. आम्ही जी चांगली कामगिरी केली आहे, तीच पुन्हा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आशा आहे की आज फलंदाजी थोडी चांगली होईल. अधूनमधून खूप त्रास होतो. आशा आहे की, पाऊस पडत असेल तर तो सुरूच राहील. पाऊस नसेल, तर तो थांबेल अशी आशा आहे. मैदानावर परत येणे आणि पुन्हा बाहेर जाणे खूप कठीण आणि आव्हानात्मक आहे. आम्ही त्याच संघासोबत खेळत आहोत .’

https://www.prahaar.in/2026/11/09/england-cricket-squad-south-africa-tour-announced-uncapped-player-selected-major-changes-in-team/
मिचेल सँटनरने अशा मांडल्या भावना
मिचेल सँटनर म्हणाला की, ‘मला वाटतं की एकदिवसीय क्रिकेटमध्ये, साधारणपणे ३०० ही एक चांगली धावसंख्या मानली जाते. पण मला वाटतं की कदाचित १८० ही एक चांगली धावसंख्या ठरली असती. पण हो, मला वाटतं की एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहसा रात्री परिस्थिती थोडी बदलू शकते, पण आमच्यासाठी अजूनही थोडी परिस्थिती अनुकूल होती, जे चांगलं होतं. आणि मला वाटतं की आज परिस्थितीचा अंदाज अगदी सुरुवातीलाच घ्यावा लागेल. चांगली धावसंख्या कोणती आहे, बचाव करण्यासारखी धावसंख्या कोणती आहे, हे पाहावं लागेल.’
चौथ्या आणि पाचव्या वनडेत भारताला टेन्शन
चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यात शुभमन गिलसह काही खेळाडू खेळणार नाहीत. कारण कसोटी मालिकेच्या तयारीसाठी या दोन सामन्यात न खेळण्याचा निर्णय आधीच ठरला होता. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यात भारताचं नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताला एक विजय मिळवणं भाग आहे. अन्यथा ही मालिका बरोबरीत सुटेल.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language