Hashtagintro

Wedding Muhurat November 2026: तुळशी विवाहानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईसाठी नोव्हेंबरमध्ये फक्त 4 शुभ मुहूर्त!

Wedding Muhurat November 2026: नुकताच दिवाळी हा सण पार पडला. दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात होते. देवउठनी एकादशी आणि तुळशी विवाहानंतर चातुर्मासाची समाप्ती झाल्यावर लग्नाला सुरुवात केली जाते. दरवर्षी चातुर्मासात विवाहासह अनेक शुभ कार्ये केली जात नाहीत. यंदा, 20 नोव्हेंबर 2026 रोजी देवउठनी एकादशीला चातुर्मास संपणार असून, त्यानंतर विवाहासह इतर मांगलिक कार्यांना सुरुवात होईल. परंतु यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लग्नासाठी केवळ ४ शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. ते मुहूर्त कोणते तसेच शुभ तारखा कोणत्या?
विवाहाचे 4 शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, 20 नोव्हेंबर रोजी शुक्रवारच्या दिवशी देवउठनी एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. याचवेळी चातुर्मास संपतो असे म्हंटले जाते आणि विवाह, गृहप्रवेश यांसारख्या शुभ कार्यांना पुन्हा सुरुवात होते.
https://www.prahaar.in/2026/11/12/thane-gaodevi-market-fire-incident-job-provided-to-sagar-shindes-wife-on-compassionate-grounds/
1. 21 नोव्हेंबर 2026, शनिवार
विवाहासाठी नोव्हेंबर महिन्यातील पहिला शुभ मुहूर्त 21 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी सकाळी 6 वाजून 47 मिनिटांपासून मध्यरात्री 12 वाजून 8 मिनिटांपर्यंत विवाहासाठी शुभ वेळ आहे. या काळात रेवती नक्षत्र असणार आहे.
2. 24 नोव्हेंबर 2026, मंगळवार
दुसरा शुभमुहूर्त विवाहासाठी 24 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी रात्री 11 वाजून 25 मिनिटांपासून 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजून 50 मिनिटांपर्यंत विवाह करता येईल. या काळात रोहिणी नक्षत्र आहे.
3. 25 नोव्हेंबर 2026, बुधवार
25 नोव्हेंबर रोजीही विवाहासाठी शुभ मुहूर्त असून या दिवशी सकाळी 6 वाजून 50 मिनिटांपासून 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजून 51 मिनिटांपर्यंत शुभ वेळ आहे. या काळात रोहिणी आणि मृगशीर्ष नक्षत्र असतील. नोव्हेंबर महिन्यातील हा सर्वात मोठा विवाह मुहूर्त या दिवशी असणार आहे.
4. 26 नोव्हेंबर 2026, गुरुवार
नोव्हेंबर महिन्यातील विवाहाचा शेवटचा शुभ मुहूर्त 26 नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी सकाळी ६ वाजून 51 मिनिटांपासून संध्याकाळी 5 वाजून 47  मिनिटांपर्यंत विवाहासाठी शुभ वेळ असणार आहे. या काळात मृगशीर्ष नक्षत्र असेल.
विवाहासाठी शुभ मुहूर्त महत्त्वाचे का असते?
हिंदू धर्म आणि वैदिक परंपरेनुसार विवाह कार्य शुभ मानले जाते. तसेच त्याची तारीख आणि वेळ ठरवताना म्हणजेच शुभ मुहूर्त बघण्याला महत्त्व दिले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, विवाहाचा मुहूर्त ठरवताना तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पंचांगातील पाच अंगांचा विचार केला जातो. यासोबतच गुरु आणि शुक्र या ग्रहांची स्थिती देखील पाहिली जाते.
तसेच, धार्मिक मान्यतेनुसार, अनुकूल ग्रहस्थिती आणि नक्षत्रांमध्ये विवाह केल्यास वधू-वरांच्या वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि स्थैर्य राहते. विवाहाची वेळ ठरवताना वधू-वरांच्या जन्मकुंडलीचेही मिलन केले जाते. यामध्ये मंगळदोष आणि इतर ग्रहस्थिती तपासून योग्य वेळ निवडली जाते.
Disclaimer: या बातमीतील माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language