जगातील सर्वात तरुण टी-20 कर्णधार: वैभव सूर्यवंशीने वयाच्या अवघ्या 15 वर्षे आणि 232 दिवसांत पुरुष टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवण्याचा विश्वविक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला.
सौराष्ट्रविरुद्ध मैदानात उतरला: सैयद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत वैभव बिहार संघाचे नेतृत्व करत आहे. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
फलंदाजीतही दाखवली चमक: सौराष्ट्रविरुद्ध वैभवने 12 चेंडूंमध्ये 18 धावा केल्या. 150 च्या स्ट्राइक रेटने खेळताना त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला.
मोडला युवा कर्णधाराचा विक्रम: वैभवने क्रोएशियाच्या जॅक वुकुसिकचा विक्रम मोडला. वुकुसिकने वयाच्या 17 वर्षे आणि 311 दिवसांत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या देशाचे नेतृत्व केले होते.
कमी वयात अनेक विक्रम नावावर: वैभवने यापूर्वी सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे. तसेच IPL 2025 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या 35 चेंडूंमध्ये शतक ठोकून इतिहास घडवला होता.
Source: TV9 Marathi Sports





